Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaEffect : क्वारंटाईन होण्यास नकार देणाऱ्या १८ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

Spread the love

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात करोना रुग्णाच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीतील १८ जणांनी क्वारंटाईन होण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर काल शुक्रवारी सायंकाळी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे क्वारंटाईन न होणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमळनेर शहरातील वाडी चौकाजवळ असलेल्या गुरव गल्लीमधील एक कुटुंबांला कोरोनाचे लक्षणे दिसत असल्याने त्यांच्या स्वॅबचे नमूने घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानतंर हे कुटुंब करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेले गुरव गल्लीमधील १८ जणांना सुरक्षिततेचे उपाय म्हणून क्वारंटाइन करण्यासाठी नगर पालिकेचे कर्मचारी गेले होते.

या तीन कुटुंबातील १८ जणांनी प्रताप महाविद्यालय परिसरातील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन होण्यास नकार दिला. क्वारंटाईन होण्यास नकार देत असल्याने मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्या आदेशान्वये अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगावमधील करोनाबाधितांची संख्या २७०६ झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार ४९६ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात करोनाने आतापर्यंत २०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात १ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!