Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaEffectUpdate : विलगीकरण कक्षातील २९ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Spread the love

दिवसेंदिवस राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे आकडे वाढत असून लोकांमध्ये या आजाराची भीतीही वाढत आहे. याच भीतीतून काही ठिकाणी आत्महत्या होत आहेत. गेल्या तीन महिन्यांत राज्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. मानसिक नैराश्यामुळे देखील असे प्रकार घडत असल्यानं राज्य सरकारनं समुपदेशनासाठी हेल्पलाइनही जारी केली आहे. त्यानंतरही हे प्रकार सुरूच असल्यानं चिंता वाढली आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या युवकाने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या युवकाने विलगीकरण कक्षात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे तीन वाजताच सुमारास घडली. अजमद खाँ सत्तार खॉ (२९) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

याविषयीची अधिक माहिती अशी कि , नांदगाव खंडेश्वर येथे एक व्यक्ती दिनांक २५ जून रोजी करोना पॉझिटिव्ह आढळला होता. सदर व्यक्तींच्या संपर्कात काही नागरिक आले होते. त्यामुळे प्रशासनाने नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय वसतिगृहात सदर व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना विलगीकरण केले होते. या विलगीकरण कक्षात गेल्या दोन दिवसापासून १६ संशयीतांचे विलगीकरण करण्यात आले आहे. परंतु आज दिनांक शनिवारी सकाळी विलगीकरण कक्षातील इतरांना अजमद खा याने कक्षाबाहेरील खिडकीला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. ही बाब सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अजमद खाँ सत्तार खॉ याने स्वतःजवळच्या ओढणीने फाशी घेतली होती.

विलगीकरण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. युवकाचा मुतदेह शवविच्छदना करिता पाठविण्यात आला. तत्पूर्वी घटनेचे गांभीर्य बघता उपविभागीय महसूल अधिकारी मनीष गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी एस. डी. पी. ओ पुनम पाटील, तहसिलदार प्रशांत भोसले, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, नगर पालिका मुख्याधिकारी मिनाक्षी यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साहेबराव इंगळे, सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव, ठाणेदार उदय सोयस्कर, सह विलगीकरण कक्षाचे प्रमोद ढवळे, एस.पी सुर्यवंशी, विकास दबडगे, अभिजीत लोखंडे आदी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. सदर प्रकरणाची पुढील कार्यवाही नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदय सोयीस्कर व सहकारी करीत आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!