Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaNewsUpdate : 24 तासांत राज्यभरात 51 पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह

Spread the love

राज्यात कोरोनाचा कहर वाढतच असून प्रत्येक क्षेत्रातील लोकांना कळत – नकळतपणे जराशी जरी चूक झाली तरी कोरोनाची बाधा होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांसोबत प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले कर्मचारी देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. राज्यात मागील चोवीस तासांत 51 पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे.
मागील चोवीस तासांत राज्यभरात 51 पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर, राज्यातील करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजार 809 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 1 हजार 113 जण, उपचारानंतर बरे झालेले 678 जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 18 जणांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिसही दिवसरात्र मेहनत घेत आहेत. ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन कर्तव्य बजावत आहेत या शिवाय, सर्वाधिक रुग्ण संख्या असणाऱ्या प्रतिबंधीत क्षेत्रातही ते दिवसरात्र तैनात आहेत, दरम्यान अनेकांच्या संपर्कात येत असल्याने आता हेच पोलिस कोरोनाच्या कचाट्यात येत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!