Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मुंबईत आणखी दोन पोलिसांचा मृत्यू , राज्यातील कोरोना बळींची संख्या १४ वर…

Spread the love

मुंबईत कोरोनाशी चालू असलेल्या युद्धात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही  या विषाणूचा सामना करावा लागत असून आज बुधवारी आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सहार वाहतूक विभागातील सहायक फौजदार भिवसेन पिंगळे आणि हवालदार गणेश चौधरी या दोघांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे . कोरोनाने आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील दहा कर्मचाऱ्यांचा बळी  असून राज्यामध्ये मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

मुंबईच्या धारावीतील शाहूनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी वाहतूक विभागात कार्यरत असलेले आणि सध्या सहार येथे नेमणुकीला असलेले सहायक फौजदार भिवसेन पिंगळे यांचा मृत्यू झाला. सर्दी, ताप तसेच इतर लक्षणे असल्याने पिंगळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पार्क साईट पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेले गणेश चौधरी हे विक्रोळी पूर्व टागोरनगर येथे वास्तव्यास होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

दरम्यान, आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील दहा कर्मचाऱ्यांचा करोनानं मृत्यू झाला आहे. तर राज्यभरात एकूण १४ पोलिसांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई पोलीस दलातील २२७ करोनाबाधित कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केली असून, ते घरी परतले आहेत. ते करोना संकटात पुन्हा सेवेसाठी सज्ज झाले आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!