Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : महाराष्ट्रात एकूण रुग्णांची संख्या ३५ हजाराच्या वर , जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्ण

Spread the love

राज्यात चौथ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली असली तरी महाराष्ट्रात आज २०३३ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज राज्यात ७४९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातल्या आत्तापर्यंत ८ हजार ४३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत अशी माहितीही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर आज राज्यात आज ५१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असंही समजतं आहे. राज्याच्या करोना ग्रस्तांच्या संख्येने ३५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३५ हजार ५८ इतकी झाली आहे. सध्याच्या घडीला २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात जे ५१ मृत्यू झाले त्यापैकी मुंबईत २३, नवी मुंबईत ८, पुण्यात ८, जळगावात ३, औरंगाबादमध्ये २, अहमदनगरमध्ये २, नागपुरात २, भिवंडीत १, तर पालघरमध्ये १ मृत्यू झाला आहे. बिहार राज्यातील एका मृत्यूची नोंदही मुंबईत करण्यात आली आहे. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार आज झालेल्या ५१ मृत्यूंपैकी ३५ पुरुष तर १६ महिला आहेत. या मृत्यूंमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरच्या वयाचे ५१ रुग्ण होते. तर १९ रुग्ण हे ४० ते ५९ रुग्ण होते. ११ जण ४० वर्षे वयाखालील होते. ५१ पैकी ३५ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे आजार होते. या मृत्यूंमुळे महाराष्ट्रातल्या एकूण मृत्यूंची संख्या १२४९ झाली आहे.

राज्यात कुठे, किती रुग्ण? (कंसात मृत्यूची संख्या)

मुंबई महापालिका: २१ हजार ३३५ (७५७). ठाणे: २३० (४), ठाणे महापालिका: १ हजार ८०४ (१८), नवी मुंबई महापालिका: १ हजार ३८२ (२२), कल्याण-डोंबिवली महापालिका: ५३३ (६), उल्हासनगर महापालिका: १०१, भिवंडी-निजामपूर मनपा: ४८ (३), मीरा-भाईंदर मनपा: ३०४ (४), पालघर: ६५ (३), वसई-विरार मनपा: ३७२ (११), रायगड: २५६ (५), पनवेल मनपा: २१६ (११), ठाणे मंडळ, एकूण: २६ हजार ६४६ (८४४). नाशिक: १०६, नाशिक मनपा: ७४ (१), मालेगाव मनपा: ६७७ (३४), अहमदनगर: ६५ (५), अहमदनगर मनपा: १९, धुळे: १२ (३), धुळे मनपा: ७१ (५), जळगाव: २३० (२९), जळगाव मनपा: ६२ (४), नंदुरबार: २५ (२), नाशिक मंडळ, एकूण: १ हजार ३४१ (८३). पुणे: २०४ (५), पुणे मनपा: ३ हजार ७०७ (१९६), पिंपरी-चिंचवड मनपा: १६० (४), सोलापूर: ९ (१), सोलापूर मनपा: ४२० (२४), सातारा: १४० (२), पुणे मंडळ, एकूण: ४ हजार ६४० (२३२). कोल्हापूर: ४४ (१), कोल्हापूर मनपा: ८, सांगली: ४५, सांगली-मिरज कुपवाड मनपा: ८ (१), सिंधुदुर्ग : १०, रत्नागिरी: १०१ (३), कोल्हापूर मंडळ, एकूण: २१६ (५). औरंगाबाद: १६, औरंगाबाद मनपा: ९५८ (३३), जालना: ३६, हिंगोली: १०४, परभणी: ५ (१), परभणी मनपा: २, औरंगाबाद मंडळ, एकूण: १ हजार १२१ (३४). लातूर: ४७ (२), लातूर मनपा: ३, उस्मानाबाद: ११, बीड: ३, नांदेड: ९, नांदेड मनपा: ६९ (४), लातूर मंडळ, एकूण: १४२ (६). अकोला: २८ (१), अकोला मनपा: २४६ (१३), अमरावती: ७ (२), अमरावती मनपा: १०८ (१२), यवतमाळ: १००, बुलढाणा: ३० (१), वाशिम: ३, अकोला मंडळ, एकूण: ५२२ (२९). नागपूर: २, नागपूर मनपा: ३७३ (४), वर्धा: ३ (१), भंडारा: ३, गोंदिया: १, चंद्रपूर: १, चंद्रपूर मनपा: ४, नागपूर मंडळ, एकूण: ३८७ (५). इतर राज्ये: ४३ (११). एकूण: ३५ हजार ५८ (१२४९).

आपलं सरकार

Click to listen highlighted text!