Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffect : माजी पंतप्रधान यांची प्रकृती स्थिर , कोरोनाची चाचणी निगेटिव्ह

Spread the love

देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नव्या औषधांची रिअॅक्शन झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. नवीन औषधांच्या रिअॅक्शनमुळे मनमोहन सिंग यांना ताप आला होता. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. यामुळे रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांना कार्डिओथोरॅसिक विभागात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. डॉक्टरांची एक टीम मनमोहनसिंग यांची देखभाल करत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. २००९ मध्ये मनमोहन सिंग यांच्यावर एम्समध्येच कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!