Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : कोरोनाच्या नावावर खासगी बड्या रुग्णालयांकडून लूट , हातात दिलेले बिल पाहून बसेल धक्का…!!

Spread the love

पुण्यातील एका कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी चार लाख रुपये घेण्यात येत असल्याची तक्रार आल्याने चंदननगर-खराडी येथील कोलंबिया एशिया हॉस्पिटलला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांना ही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या नोटिशीनुसार तत्काळ लेखी खुलासा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. पुणे शहर व परिसरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.

या परिस्थितीत या हॉस्पिटलमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल हे प्रत्येक रुणाकडून चार लाख रुपये घेत आहे. त्यामुळे हॉस्पिटलकडून आकारण्यात येणारा खर्च कमी करण्यात यावा; तसेच हॉस्पिटलविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५; तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ नुसार आपणाविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये, असे या नोटिशीमध्ये म्हटले आहे. ही नोटीस मिळताच तत्काळ लेखी खुलासा सादर करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करणेत येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी राम यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात, राज्यात आणि पुणे जिल्हयामध्ये गतीने पसरत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केले आहे. त्या अनुशंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. राज्य सरकारने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात भारतीय साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधीत तरतुदीनुसार अधिसूचना काढली आहे. त्यानुसार ही कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी नोटिशीत स्पष्ट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!