Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : जून -जुलै मध्ये वाढू शकतो कोरोनाचा कहर …..केंद्र सरकारतर्फे बदलले जाताहेत नियम , लवकरच येतेय नव्या झोनची यादी

Spread the love

केंद्र सरकारच्या वतीने कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर  काही प्रमाणात लॉकडाउनच्या अटी शिथिल करीत असताना आणि देशभरातून राज्याराज्यांमध्ये स्थलांतरित मजूर परतत असताना नवे आव्हान उभे राहणार असून करोनासोबत जगणे शिकावे लागणार आहे. हे आव्हान खूप मोठे असून करोनापासून बचाव करण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना नागरिकांच्या वर्तनात सामुदायिक बदलाची आवश्यकता असेल, असा शासनाचं संदेश  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी जनतेला दिला आहे. दरम्यान  रेड, ग्रीन, ऑरेंज जिल्हे निश्चित करताना रुग्णसंख्या, त्यांचा दुप्पट होण्याचा वेग, चाचण्यांची संख्या आणि निगराणीवर असलेल्या पथकाचा अहवाल यासारखे सर्व प्रकारचे पैलू विचारात घेतले जातात. त्याआधारे केंद्राने ३० एप्रिलला राज्यांना ग्रीन, रेड आणि ऑरेंज जिल्ह्यांची यादी सोपवण्यात आली होती. त्यानंतर आलेल्या ताज्या माहितीचे विश्लेषण करून ताजी यादी राज्यांना सोपवण्यात येईल असे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून करोनारुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस घटले आहे. अशा स्थितीत सावधगिरी बाळगली नाही तर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असते, असा इशाराही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. दरम्यान  जून-जुलैमध्ये करोनाचा कहर शिगेला पोहोचेल, असा  सतर्कतेचा इशारा अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. मात्र कोरोनाला रोखण्यासाठीच्या आवश्यक निर्देशांचे आणि प्रक्रियांचे पालन केले तर करोना रुग्णसंख्या शिगेला पोहोचणार नाही, पण सावधगिरीचे पालन केले नाही तर रुग्णसंख्येत वेगाने वाढ होण्याची शक्यता असते. तशी वेळ येऊ नये म्हणून नागरिकांकडून सर्वप्रकारच्या सहकार्याची सरकार अपेक्षा करीत आहे, असे त्यावर स्पष्टीकरण देताना  आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले.

महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये खूप रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्र आणि राज्यांनी समन्वयाद्वारे नियंत्रण प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी प्रतिबंधाचे सर्व प्रयत्न अत्यंत कठोरपणे अंमलात आणण्याची गरज आहे, असे अग्रवाल म्हणाले. जून-जुलैमध्ये शिगेला पोहोचणार असेल तर रुग्णसंख्या कितीवर पोहोचेल याचे आकलन करणे अवघड आहे. पण आजच्या स्थितीत दररोज वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता दर १० दिवसांनी ती दुप्पट होत आहे. सामूहिकपणाने काम करीत राहिलो तर रुग्णसंख्या नियंत्रणाखाली ठेवणे शक्य आहे, असे अग्रवाल म्हणाले. रेल्वेने ५२३१ डब्यांना अतिसौम्य आणि सौम्य रुग्णांवरील उपचारासाठी करोना सुश्रुषा केंद्र म्हणून विकसित केले आहे. या डब्यांना २१५ रेल्वेस्थानकांवर ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ८५ स्थानकांवर रेल्वेकडून आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील. उर्वरित १३० स्थानकांवर राज्य सरकारच्या वतीने कर्मचारी आणि आवश्यक औषधे उपलब्ध करुन दिले हातील. रेल्वेकडून २५०० डॉक्टर आणि ३५ हजार निमवैद्यकीय कर्मचारी करोना व्यवस्थापनासाठी देण्यात आले आहेत.

दरम्यान आयसीएमआरकडून देशातील २१ रुग्णालयांत प्लाझ्माच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील ५, गुजरातमधील ४, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी दोन, पंजाब, चंदिगड, कर्नाटक आणि तेलंगणमधील प्रत्येकी एका रुग्णालयाचा समावेश आहे. देशातील २१६ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत करोनारुग्ण आढळलेला नाही. गेल्या २८ दिवसांमध्ये एकही रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांची संख्या ४२ झाली आहे. २१ दिवसांमध्ये २९ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्ण सापडलेला नाही, १४ दिवसांमध्ये ३६ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची नोंद झालेली नाही. ४६ जिल्ह्यांमध्ये सात दिवसांपासून नव्या रुग्णाची नोंद नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!