Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : दारूच्या थेट विक्री ऐवजी लोकांना ऑनलाईन घरपोच देण्याची व्यवस्था करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Spread the love

देशात सर्वत्र कोरोनामुळे चालू असलेले लॉकडाऊन  आणि टाळेबंदीमुळे लोक त्रस्त असून दरम्यानच्या काळात सरकारने अंशतः दारू विक्रीला परवानगी  देण्यात आल्यानंतर मद्यविक्री दुकानांपुढे लांबच लांब रांगा लागू लागल्या. यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी लॉकडाउन काळात मद्याच्या थेट विक्रीऐवजी ऑनलाईन विक्री आणि त्याची होम डिलिव्हरी करण्याबाबत विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सर्व राज्य सरकारांना दिले. केंद्रीय गृह मंत्रालयाने १ मे रोजी दिलेल्या आदेशानंतर देशात मद्यविक्रीला सुरुवात झाली. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

न्यायमूर्ती अशोक भूषण, न्या. संजय किशन कौल आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठापुढे याबाबत शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. याचिकाकर्ते गुरुस्वामी नटराज यांच्या वतीने अॅड. साई दीपक यांनी सुनावणीदरम्यान म्हणणे मांडताना सांगितले की, देशात ७० हजारहून अधिक मद्यविक्रीची दुकाने असून, पाच कोटींहून अधिक ग्राहकांनी या दुकानांमधून मद्याची खरेदी केली आहे. या खरेदी-विक्रीवेळी मद्यविक्रेते आणि दुकानदारांकडून सामाजिक वावराच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. यामुळे करोनाच्या संसर्गामध्ये वाढ झाली असून, यामुळे एक महिन्याच्या लॉकडाउन काळात केलेल्या उपाययोजनांवर पाणी फेरले गेले आहे. यामुळे दुकानांमध्ये मद्यविक्री करण्यावर निर्बंध घालून ऑनलाइन किंवा होम डिलिव्हरीद्वारे मद्यविक्री करण्याचे निर्देश देण्यात यावे. यावर खंडपीठाने राज्य सरकारांनी लॉकडाउन काळात थेट मद्यविक्री करण्याऐवजी ऑनलाइन किंवा होम डिलिव्हरीसारख्या उपायांचा विचार करावा, असे निर्देश दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!