#AurangabadNewsUpdate : औरंगाबादच्या सहा पोलिस अधिका-यांना महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रदान करणार महासंचालकांचे पदक
औरंंंगाबाद : पोलिस आयुक्तालय हद्दीत कार्यरत असलेल्या सहा पोलिस अधिका-यांना महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनी (दि.१) हे विशेष सेवा पदक अधिका-यांना पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
औरंगाबाद पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त-१, पोलिस निरीक्षक-२, सहाय्यक पोलिस निरीक्षक तीन-३ अशा सहा जणांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.एकाच वेळी औरंगाबादच्या सहा अधिका-यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पदकप्राप्त सर्व अधिका-यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
औरंगाबाद पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, हायकोर्ट सुरक्षा विभागाचे निरीक्षक कैलास प्रजापती, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल, महिला तक्रार निवारण कक्षाच्या सहाय्यक निरीक्षक किरण पाटील, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना पोलिस दलात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. १ मे रोजी औरंगाबादचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पदकप्राप्त अधिका-यांना विशेष सेवा पदक प्रदान केल्या जाणार आहे.