#AurangabadNewsUpdate : #CoronaEffect : मास्क न लावणाऱ्यांकडून मनपाने वसूल केला साडेतीन लाखाचा दंड…
औरंगाबाद : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात पोलिसांनी कोणत्याही व्यक्तीस परिसरात येण्यास किंवा बाहेर जाण्यास प्रतिबंध केलेला आहे. असे असतांना देखील परिसरामध्ये विना मास्क फिरणार्या व प्रतिबंध क्षेत्रातून बाहेर ये-जा करणार्या एका सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी पकडले असुन त्यांच्या विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदिर हबीब मोहम्मद (40, रा. आसेफिया कॉलनी) असे संशयीताचे नाव आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक सैय्यद करित आहेत.
औरगाबाद शहरामध्ये मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे यांच्या आदेशानुसार पुढील प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली….
एकूण पथक … ९ (९ झोनमध्ये)
एकूण कारवाई.. १५
एकूण दंड ..रुपये ७५००/-
आतापर्यंत एकूण कारवाई… ७१५ एकुण दंड वसूल… रुपये ३,५७, ५००/-
अलगीकरण कक्षाला प्रशासकांची भेट
दरम्यान आज दि 27 एप्रिल रोजी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडये यांनी किल्ले अर्क येथे संत तुकाराम वसतिगृह जो साध्यास्थिती मनपाचे अलगिकरण कक्ष येथे समक्ष पाहणी केली. जेवणाचा दर्जा आणि चव बाबत त्यांनी समाधान व्यक्त केला. 24 एप्रिल रोजी त्यांना संत तुकाराम वसतिगृह येथे देण्यात येणारे जेवणच्या दर्जा बाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यांनी तत्परतेने या तक्रारीचे दखल घेऊन तेथे जेवण पुरवठादार वर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या शिवाय आज त्यांनी संत तुकाराम वसतिगृह येथे अलगीकृत प्रत्यक व्यक्तीशी संवाद साधला आणि त्यांचे कक्षांची पाहणी केली.
संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन
दरम्यान संचारबंदी,जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार्या 15 जणांवर पाच पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये विनाकारण दुचाकीवर फिरणार्या अब्दुल वसिम अब्दुल बारी (29) व शेख अन्सार शेख निसार (21, दोघे रा. फिरदोस गार्डन पडेगाव) व डुक्कर पाळणार्या संतोष भानुदास गायकवाड (42, रा. भिमनगर, भावसिंगपुरा) या तिघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत भदाने पाटील (39, द्वारकानगर, हडको)याच्या विरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात तर सय्यद कलीम सय्यद विखार (19, रा. किराडपुरा), शेख अशिख शेख मासुन (45, रा. बायजीपुरा), समीर अहेमद शफीख अहेमद (35, रा. जसवंतपुरा) व शेख हबिब शेख हनिफ (50, रा. रहेमानिया कॉलनी) या चौघा फळ व दुध विक्रेत्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संचार बंदीच्या काळात विनाकारण रिक्षाची वाहतूक करणारे रिक्षाचालक जुबेर यासीन पटेल, कृष्णा उत्तम वाणी, पवन दहीहंडे, जफर खान रशीद खान, काजी मझर काजी मंजुर व अनवर खान नुर खान या सहा जणांवर हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बरोबरच मोहम्मद रफीक मोहम्मद यासीन (32), मोहम्मद नाझ मोहम्मद अय्याज (24), शेख अरबाज शेख सलीम (20, सर्व रा. सब्जीमंडी पैठणगेट) या तिघांसह विनाकारण दुचाकीवर फिरणार्या सोनु गणपत जाधव (28, रा. रोकडा हनुमान कॉलनी) यांच्याविरद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.