Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुरवठा मंत्री छगन भुजबळ एअरलिफ्टद्वारे रुग्णालयात , प्रकृती स्थिर ….

Spread the love

मुंबई : महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. छगन भुजबळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यादरम्यान त्या ठिकाणी गेले होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्याहून मुंबईत आणण्यात आलं. मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली छगन भुजबळ यांच्यावर उपचार सुरु आहेत.

छगन भुजबळ यांना ताप आला आणि घशाचा संसर्ग झाला त्यामुळे त्यांना आज दुपारी पुण्यातून मुंबईत आणण्यात आले . मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं छगन भुजबळ यांच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्याहून मुंबईत एअरलिफ्ट करुन आणण्यात आले आहे. सध्या छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मिळते आहे.

छगन भुजबळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असल्याने त्यांच्यासह पुणे दौऱ्यावर गेले होते.  आपल्या पुणे दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी वार्तालापही केला होता. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. आज सकाळपासूनच त्यांना वाटत होते . त्यानंतर त्यांना ताप आला आणि घशाचाही त्रास जाणवू लागला. पुण्यातील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुण्यातून एअरलिफ्ट करुन मुंबईत आणण्यात आले . बॉम्बे रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. छगन भुजबळ हे उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद देत आहेत असे सांगण्यात आले आहे. याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये छगन भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याने मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!