#CoronaAurangabadUpdate : दिवस मावळला तेंव्हा औरंगाबादमध्ये “इतके ” वाढले कोरोनाचे रुग्ण ….!! प्रसूती झालेली महिला कोरोनामुक्त…
आतापर्यंत 130 कोरोनाबाधित, प्रसूती झालेली महिला कोरोनामुक्त
औरंगाबाद जिल्ह्यातील 101 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू
23 जण झाले बरे, 07 कोरोनाबाधितांचा मृत्यू
औरंगाबाद शहरात आज एकूण 21 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची संख्या 130 झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटीत) 91, घाटीत 09 नवीन कोरोनाबाधितांवर, तर अन्य एका जुन्या कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, (हा रुग्ण पूर्वीचाच असल्याने नवीन रुग्ण म्हणून गृहीत धरल्या जात नाही) असे एकूण 101 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याचे मिनी घाटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.
पॉझिटिव्ह आलेल्या
नूर कॉलनीतील 11,
किलेअर्क 02,
असेफिया कॉलनी 05,
भीम नगर, भावसिंगपुरा येथील प्रत्येकी एक रुग्ण
असे एकूण 19 रुग्ण मिनी घाटीत दाखल झाल्याने एकूण 91 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
घाटीत नऊ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. अशा एकूण 101 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये नवीन कोरोनाबाधित 100 आहेत. तर जुन्या रुग्णांपैकी एक रुग्ण परत उपचारासाठी दाखल झालेला आहे.एकूण मृत सात आणि बरे होऊन घरी परतणारे 23 असे एकूण 130 कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले आहेत.
मिनी घाटीत 33 वर्षीय महिला रुग्णाची सिझेरियन होऊन त्या कोरोनाग्रस्त महिलेने एका चिमुकलीस जन्म दिलेला आहे. त्या महिलेची चाचणी निगेटीव्ह आल्याने ती महिलाही आज कोरोनामुक्त झाली. तिला डिस्चार्ज देण्यात आला. आज मिनी घाटीत 28 जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. काल आणि आजचे मिळून 35 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.
घाटीत नऊ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(घाटी) मध्ये दुपारी चार वाजेपर्यंत 28 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 14 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सहा जणांचा अहवाल निगेटीव्ह आलेला आहे. आठ जणांचा येणे बाकी आहे.कोरोनाबाधित रुग्णांमध्ये औरंगाबादेतील गुलाब नगर येथील 64 वर्षीय पुरूष, गुरूदत्त नगर, गारखेडा परिसरातील 47 वर्षीय पुरूष यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे घाटीत आता नऊ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात एकूण 42 रुग्ण भरती आहेत. चार कोविड निगेटीव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. मागील चोविस तासात पळशी शहर, बिसमिल्ला कॉलनी येथे राहणाऱ्या नऊ महिने वयाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. तिचा अहवाल कोविड निगेटीव्ह आलेला आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे.
कोवीड- 19 पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
1. सिडको एन वन -01 | 2. सिडको एन -फोर – 02 | 3. आरेफ कॉलनी -02 | 4. जलाल कॉलनी -03 | 5. देवळाई- 03 | 6. सातारा -05 | 7. पदमपुरा-01 | 8. मिटमिटा-01 | 9. एहबाब कॉलनी -02 | 10. यादव नगर एन 11 – 01 | 11. हिलाल कॉलनी -04 | 12. बायजीपुरा 3 | 13. बिस्मिल्ला कॉलनी – 02| 14. किरडपुरा-05 | 15. आसेफिया कॉलनी- 20 |16. नूर कॉलनी -22 | 17. पाणचक्की – किल्ले अर्क -19 | 18. भिमनगर 6 | 19. समता नगर- 09 | 20. संजय नगर मुकुंदवाडी 2 , | 21. काला दरवाजा-01 | 22. बडा तकिया मस्जिद 01 | 23. बागवान मस्जिद ,पैठणगेट -05 | 24. जय भीम नगर टाऊन हॉल-01 | 25. गुरुदत्त नगर गारखेडा-01 | 26. चेलीपुरा- 01
महिला 54 | पुरुष 69 | एकूण 123
Aurangabad : Final Update : 07.20 PM