Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : भाजपच्या आमदार महोदयांचा व्हिडीओ व्हरायल, तुम्हीच बघा काय म्हणताहेत ?

Spread the love

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे कोरोना फैलावाच्या जागतिक संकटातही धर्मांधतेचा विषाणू भारताच्या एकात्मतेला संक्रमित करण्याचा प्रयत्न करतोय. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन सुरू असतानाच एक भाजप आमदाराचा धार्मिक तेढ निर्माण करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बरहज विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश तिवारी यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत ते जनतेला कोणत्याही मुस्लीम व्यक्तीकडून भाजी विकत न घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.


या व्हिडिओमध्ये हे आमदार महोदय बोलताना ऐकू येतात कि , ‘एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी सर्वांना जाहीररित्या सांगतोय, कुणीही मियाँकडून (मुस्लीम व्यक्तीकडून) भाजी खरेदी करणार नाही’ असं म्हणताना तिवारी या व्हिडिओत दिसत आहेत. आमदार महाशय हे बोलत असतानाच कुणीतरी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतंय की, ‘दिल्लीमध्ये यावरून गुन्हा दाखल झाला आहे’. उल्लेखनीय म्हणजे, दिल्लीत एका व्यक्ती मुस्लीम भाजी विक्रेत्याचं नाव विचारून त्याला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

दरम्यान दुसरीकडे, नुकतीच जमशेदपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या एका पोस्टरचीही बातमी समोर आली होती. या पोस्टरवर ‘हिंदू फळांचं दुकान’ असा उल्लेख करण्यात आला होता. या पोस्टरविरुद्ध जमशेदपूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मेरठमधल्या व्हॅलेन्टिस कॅन्सर रुग्णालयाकडून छापण्यात आलेल्या एका जाहिरातीत, करोना चाचणी केल्यानंतरच मुस्लीम व्यक्तींनी रुग्णालयात यावं असं म्हटलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, तबलीघी जमात प्रकरण समोर आल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडूनदेखील या घटनेला कोणत्याही एका धर्माशी किंवा जातीशी न जोडण्याची विनंती केलीय. महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!