#Corona Aurangabad Current Update : धक्कादायक : ५६ रुग्णांची बातमी प्रसिद्ध होत नाही तोच आली २७ नव्या रुग्णांची माहिती…


औरंगाबाद शहरात आज तीन रुग्ण प्रसिद्ध होत नाही तोच तब्बल एकाच वेळी २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त धडकल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे शहरातील रुग्ण संख्या ८३ वर गेेली आहे.
आज शहरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भीमनगर, भावसिंगपुरा येथील १६ वर्षीय मुलगी, नुर कॉलनीतील ५ वर्षीय मुलगा आणि किलेअर्क येथील ६५ वर्षीय महिला यांचा समावेश होता . शिवाय एका महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते . मात्र सायंकाळी हि बातमी प्रसिद्ध होत नाही तोच. अवघ्या काही वेळातच २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे सर्व रुग्ण किलेअर्क , आसेफिया कॉलनी आणि नूर कॉलनी येथील रहिवासी आहेत, अशी माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे विभागीय मंडळाचे नोडल ऑफिसर डॉ. गणेश कल्याणकर यांनी दिली. दरम्यान त्यांनी नागरिकांनी घरात राहावे , मास्क वापरावे असे आवाहन त्यांनी केले आहे.