Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : मुंबईची अवस्था चिंताजनक राज्याच्या एकूण ६५ टक्के रुग्ण मुंबईत….

Spread the love

महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४ हजार २३२ इतकी झाली आहे. सायंकाळी आलेल्या ताज्या आकडेवारीत कोरोनाच्या ४७८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्याचवेळी गेल्या २४ तासांत मुंबईत करोनामुळे ८ रुग्ण दगावले असून एकूण मृतांचा आकडा १६८ इतका झाला आहे. दरम्यान, मुंबईत आज आणखी ४८ रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत ४७३ जणांनी करोनाला हरवण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान शहरातील करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असली तरी काही दिलासादायक गोष्टीही घडत आहेत. संसर्गाच्या शक्यतेमुळं कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली मुंबईतील १८९ ठिकाणी कुठल्याही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. त्यामुळं ही ठिकाणं आता ‘कंटेन्मेंट’ यादीतून वगळण्यात आली आहेत. तेथील अतिरिक्त निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.


मुंबईत ९३० ठिकाणं कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानंतर या भागांत लॉकडाऊनपेक्षाही कठोर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, १४ दिवसांनंतर आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं हे निर्बंध उठवण्यात आले. २२ एप्रिलपर्यंत १८९ ठिकाणं कंटेन्मेंट झोनच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. तरीही सध्या मुंबईत ३०० हून अधिक ठिकाणं कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत.

एक महिन्यापूर्वी मुंबईत  केवळ ४६ रुग्ण होते. ही संख्या इतकी झपाट्याने वाढली की  मुंबईत आता ४ हजार २३२ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. राज्यात सध्या ६ हजाराहून अधिक रुग्ण झाले आहेत. राज्याच्या एकूण ६५ टक्के रुग्ण एकट्या मुंबईतच आहेत.  मुंबईत काल  दिवसभरात १८१ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर २० आणि २१ एप्रिल रोजी विविध प्रयोगशाळांमध्ये झालेल्या चाचण्यांचे जे अहवाल आले आहेत त्यात २९७ रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे एकूण ४७८ नवीन रुग्णांची भर मुंबईच्या एकूण आकडेवारीत पडली आहे. मुंबईतील आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४ हजार २३२ इतकी झाली असून आजच्या घडीला प्रत्यक्षात त्यातील ३ हजार ५९३ रुग्ण उपचार घेत आहेत. दुसरीकडे आज करोना सदृष्य लक्षणे असलेले २७८ नवीन रुग्ण दाखल झाले असून अशा रुग्णांची संख्या आता ७ हजार ६०६ इतकी झाली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व करोना सदृष्य लक्षणे असेलल्या रुग्णांना १४ दिवसांसाठी घरी अलगीकरण करण्यात येत असून मुंबईत आतापर्यंत एकूण ९२ हजार ११२ व्यक्तींना गृह अलगीकरण करण्यात आले आहे. त्यातील १८ हजार ८०७ जणांची अलगीकरणाची मुदत संपली आहे. महापालिकेकडून करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासितांची व्यापक तपासणी मोहीम सुरू आहे. शिवाय प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्वेक्षणही केलं जात आहे. या सर्वातून आतापर्यंत १ हजार ६४७ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, असेही नमूद करण्यात आले आहे.आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोना विषाणूचा फैलाव वेगानं होत आहे. धारावीत काल  करोनाचे २५ नवे रुग्ण सापडले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं करोनाबाधितांचा आकडा २१४ वर पोहोचला आहे. दुसरीकडे माहीममध्येही करोनाच्या सहा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

धारावीतील करोना विषाणूची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनासमोर आहे. करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. धारावीत आज २५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं येथील एकूण रुग्णसंख्या २१४वर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यूची संख्या १३ झाली आहे. काल झालेल्या मृत्यूमध्ये सहा महिला, तर १९ पुरूष आहेत. माहीममध्येही करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. काल  येथे करोनाचे सहा नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यात एका १३ वर्षीय मुलीलाही करोना झाला आहे. काल  सापडलेल्या करोनाबाधितांमध्ये चार महिला आणि दोन पुरुष आहेत. माहीममधील एकूण रुग्णसंख्या २४वर पोहोचली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दादरमध्येही करोनाचा एक रुग्ण सापडला आहे. येथील पोलीस वसाहतीतील एका २९ वर्षीय तरुणीला करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळं दादरमधील बाधितांची संख्या २८ वर पोहोचली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!