AurangabadCoronaUpdate : ४ नव्या रुग्णांची वाढ झाल्याने , औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४४

औरंगाबाद शहरात आज पुन्हा ४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ४४ झाली आहे . दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सहा जणांची दुसरी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. त्यामुळे या सहा जणांना आज कोरोनामुक्त झाल्याने मिनी घाटीतून डिस्चार्ज देण्यात आला. तर दुपारी भीमनगर येथील २७ आणि आसेफिया कॉलनीतील ३८ वर्षीय पुरूष रुग्णांची तर सायंकाळी समता नगरातील २४ वर्षीय पुरुष आणि ३७ वर्षीय महिला रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांची आतापर्यंतची संख्या ४४ झाली आहे. सध्या मिनी घाटीत एकूण १५ कोरोनाबाधित रुग्णांवर, तर घाटीत दोन अशा एकूण १७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
मिनी घाटीत आज एकूण ११३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६२ जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. तर १३६ जणांचे स्वॅब घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. ८१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. तर ५६ जणांचे येणे बाकी आहेत. सध्या मिनी घाटीत ७५ जण भरती असून ८१ जणांना उपचारांती घरी सोडण्यात आलेले आहे. आतापर्यंत २२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात मिनी घाटीतून २० आणि खासगी रुग्णालयातून दोन रुग्णांचा समावेश आहे. पाच रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असेही श्री. कुलकर्णी म्हणाले