#CoronaVirusEffect : येत्या दोन दिवसात प्लाझमा थेरपी सुरु होणार – डाॅ. निता भट्टाचार्य

करोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. करोना प्रतिबंधासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला हर्षवर्धन यांच्याकडून मान्यता देण्यात आली, असे टोपे यांनी सांगितले.
पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने करोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा या बैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई किटचे निर्जंतुकीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबादेत दोन दिवसात प्रारंभ : डाॅ. निता भट्टाचार्य
दरम्यान कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी येत्या दोन दिवसात डाॅ हैडगेवार रुग्णालयात प्लाझमा थेरपी सुरु होणार असल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या मेडिसीन विभाग प्रमुख डाॅ.निता भट्टाचार्य यांनी “महानायक आॅनलाईन”शी बोलतांना दिली.
कोरोना महामारीचे संपूर्ण देशातील रुग्णांच्या ६५टक्के रुग्ण महाराष्र्टात आहे.राज्यशासनाच्या वतीने काही रुग्णालयांनी केंद्रसरकाच्या ICMR कडे(इंडीयन कौन्सिलआॅफ मेडिकल रिसर्च) कोरोना विषाणू संदर्भात रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी मागितली होती.ती त्यांना मिळाली आहे.शहरातील डाॅ.हेडगेवार रुग्णालयानेही या संदर्भात आयसीएमआर कडे प्रस्ताव पाठवला आहे.त्यांनाही परवानगी मिळाल्याचे डाॅ.भट्टाचार्य यांनी सांगितले.हेडगेवार रुग्णालयातील तज्ज्ञ डाॅक्टरांच्या पथकाला डाॅ.भट्टाचार्य यांनी फक्त दोन तासात प्लाझमा थेरपीची प्रक्रिया सुरु होण्याकरता सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्या दृष्टीने हेडगेवार रुग्णालयातील तज्ज्ञ पथक कामाला लागले असून येत्या दोन दिवसात प्लाझमा थेरपीची सुरुवात होऊ शकते.या सर्व प्रक्रियेसाठी घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातील तसेच हेडगेवार रुग्णालयातील डाॅक्टर्स अपार कष्ट घेत असल्याचे डाॅ.भट्टाचार्य म्हणाल्या
प्लाझमा थेरपी म्हणजे काय ?
कोरोना विषाणू संसर्गातून पूर्णपणे बरेझालेल्या रुग्णांची प्रतिकार शक्ती सशक्त असते.त्यांच्या रक्तातील सशक्त प्रतिकार शक्तीचे घटक कोरोनाग्रस्त रुग्णाच्या शरीरात रक्ताद्वारे सोडतात व रुग्ण बरा होतो.