Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad NewsAlert : औरंगाबाद शहरात येत्या ३ मे पर्यंत दुपारनंतरच्या कडक कर्फ्यूमध्ये वाढ….रमजाननिमित्त अडीच तासांची सूट

Spread the love

कोरोना व्हायरसच्या पार्शवभूमीवर औरंगाबादचे  पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 चे कलम कलम 144, (1) (3) अन्वये  औरंगाबाद शहरात दिनांक २४ एप्रिल ते दिनांक ३ मे २०२० पर्यंत कडक कर्फ्यूचे आदेश निर्गमित केले आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे ोरोनाव्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले असून या आदेशातून

१. वैद्यकीय व तत्सम अत्यावश्यक सेवा आस्थापना

२. शेतकरी व दुग्ध उत्पादक यांना त्यांचे दैनंदिन कामाबाबत

३. परवानगी देण्यात आलेल्या औद्योगिक आस्थापना व त्यांचे कामगार

४. राज्य व केंद्र शासनाचे कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचारी

५. पेट्रोल पंप व एलपीजी गॅस वाटप केंद्र

यांना वगळता दिनांक २४ एप्रिल २०२० ते ०३ मे २०२० पर्यंत दररोज दुपारी १३.०० ते रात्री २३.०० वाजता लागू राहतील.
दरम्यान दिनांक २५  पासून सुरू होत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या रमजान निमित्ताने वर नमूद केलेल्या कालावधीत दुपारी ३.०० ते ५.३०० वाजेपर्यंत फळ विक्रेत्यांना सूट देण्यात येत आहे. या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!