#CoronaEffect : महात्मा बसवेश्वर यांची जयंती २६ एप्रिलला घरातच करण्याचे आवाहन…शिवा संघटनेचा डिजिटल जयंतीचा उपक्रम…

शिवा संघटनेच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ४० बैठका । महात्मा बसवेश्वर जयंती पंधरवाडा रद्द : प्रा.मनोहरजी धोंडे
शिवा संघटनेच्या वतिने २६ एप्रिलला सकाळी १० वाजता । आपापल्या घरी एकाच वेळी महात्मा बसवेश्वरांना जयंती निमित्त अभिवादन करण्याचा निर्णय
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 24 मार्च 2020 ते 14 एप्रिल 2020 पर्यंत देशभर “लाॅकडाऊन” घोषीत करून पुन्हा त्यात 3 मे पर्यंत वाढ केली आहे. शिवा संघटना मागील 20 वर्षांपासून प्रतिवर्षी महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा करते, परंतु यावर्षी कोरोनामुळे देशात लाॅकडाऊन चालु आहे. त्यामुळे दिनांक 26 एप्रिल 2020 रोजी “जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 889 वी जयंती” असल्यामुळे या वर्षीचा शिवा संघटनेचा महात्मा बसवेश्वर जयंती पंधरवावाडा रद्द करण्याचा निर्णय V.C. द्वारे झालेल्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहिर केला आहे. परंतु तरीही जयंतीच्या दिवशी सकाळी ठिक “दहा वाजता” आप-आपल्या घरी हजारो कुटुंबाकडुन जयंती साजरी करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
महात्मा बसवेश्वर जयंती आप-आपल्या घरीच साजरी करा
शिवा संघटनेच्या वतीने मा.प्रा.मनोहरजी धोंडे सर यांनी आवाहन केले आहे की, “अक्षय तृतीया” रविवार दि.26 एप्रिल 2020 रोजी सकाळी ठिक 10 वाजता, वीरशैव-लिंगायत धर्माचे प्रचारक व प्रसारक क्रांतीसुर्य, जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 889 वी जयंती हजारो कुटुंबांकडुन एकाच वेळी आप-आपल्या घरीच कुटुबांसह साजरी करा असे आवाहन केले आहे. त्यासाठी सर्वांनी जयंतीच्या दिवशी सकाळी स्नानपुजा करून घरासमोर रांगोळी काढाव्यात आणि आप-आपल्या घरावर शिवा संघटनेचा झेंडा/ध्वज लावावा आणि घरातच महात्मा बसवेश्वराचा फोटो/प्रतिमा/पुतळा मांडणी करून कुटुंबातील सर्व सदस्यांनी विभुती लावुन, आपल्या गळ्यात शिवा संघटनेचा रूमाल घालावा आणि सकाळी बरोबर 10 वाजता घरातच महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे विभुती, हळदी-कुंकु लावुन, बेल-फुल वाहुन पुजन करावे आणि घरच्या फुलांनी बनवलेला हार उपलब्ध असेल तर (कृपया बाहेरील फुलांचा हार विकत आणु नये) तो पुष्पहार व शिवा संघटनेचा रूमाल महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला घालावा आणि सर्व कुटुंबीयांनी प्रतिमेसमोर हात जोडून उभे राहुन अभिवादन करावे. अभिवादन करतांनाचा फोटो तसेच रांगोळीचा व घरावर शिवा संघटनेचा झेंडा लावलेला फोटो काढून आपले नाव, पद, पत्ता टाकुन शिवा सोशल मिडियावर सकाळी ठिक 11 वाजेच्या अगोदर टाकावा.
याच पद्धतीने महाराष्ट्रासह देशभरातील लाखो कुटुंबाकडून सकाळी ठिक 10 वाजता जयंती निमित्त एकत्रित अभिवादन केल्याचे फोटो व्हारल करून सोशल मीडिया वर वादळ निर्माण करावे असे आवाहन शिवा संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव व कलेक्टर यांना शासकीय जयंती करण्याचे हजारो ई-मेल पाठवणार
कोरोनाच्या संकटामुळे शासन-प्रशासन व्यस्त असुन मुख्यमंत्री नवीन आहेत. त्यामुळे शिवा संघटनेमुळे 20 वर्षांपासून सुरूवात झालेली शासकीय जयंतीची परंपरा यावर्षी खंडित होऊ नये यासाठी महाराष्ट्रातुन हजारो ई-मेल द्वारे आठवण पत्र पाठवण्यात येणार आहेत. सदर आठवण पत्राचा मजकूर आणि ई-मेल आयडी स्वतंत्रपणे शिवा संघटनेच्या वतीने सोशल मीडिया वर दिलेली आहेत. तो मजकूर आप-आपल्या लेटर पॅडवर किंवा को-या पेपरवर लिहुन/ टाईप करून आपल्या स्वाक्षरीसह नाव, पत्ता व पद लिहुन सोबत दिलेल्या ई-मेल आयडीवर मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, व आप-आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर यांना ई-मेल वर पाठवावेत असेही आवाहन करण्यात आले आहे.
शिवा संघटनेच्या स्थापनेचे (25वे वर्ष) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त “पंचसूत्री” (पाच संकल्प)ची आमलबजावणीची घोषणा:-
शिवा संघटनेची स्थापना दि.28 जानेवारी 1996 रोजी झालेली असुन चालु वर्ष 25 वे वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे शिवा संघटनेच्या प्रवासातील चालु वर्ष अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. त्यामुळे शिवा संघटनेच्या मागील 25 वर्षाच्या कार्याचा आढावा घेऊन सिंहावलोकन करणारे खंड प्रकाशित करणे आणि शिवा संघटनेच्या पुढील 25 वर्षासाठीचा मास्टर प्लॅन बनवणे, यादृष्टीने चालू -वर्ष महत्वाचे आहे.
म्हणूनच शिवा संघटनेचे ५ संकल्प म्हणजे शिवाची “पंचसूत्री” पुर्ण ताकतीनिशी आमलबजावणी करण्याचा निर्णय झाला आहे.
शिवाचे पाच संकल्प (“पंचसूत्री”) खालील प्रमाणे:
१) शिवा संघटनेच्या मागील पंचवीस वर्षाच्या कार्याचा आढावा घेऊन सिंहावलोकन करणारे खंड (ग्रंथ) छापून प्रकाशित करून पुढील पिढ्यांना शिवाच्या संघर्षाचा इतिहास कळविणे.
२)”शिवा संपर्क अभियान” राबवून १८ ते २५ वयोगटातील प्रत्त्येक शाखेला २१ पदाधिकारी घेऊन ३००० शाखांची पुनर्रचना करून ६०,००० नवीन तरूण कार्यकर्ते जोडणे व पुढील कार्याची धुरा त्यांच्यावर सोपोवणे.
३) “शिवा सृष्टी” नावाचे नांदेडमध्ये शिवा संघटनेचे मुख्यालय निर्माण करण्यासाठी स्वतंत्र धर्मादाय ट्रस्टची नोंदणी करून 5 एकर जमीनीवर सुसज्ज राष्ट्रीय कार्यालय निर्माण करणे.
४) महात्मा बसवेश्वर यांचे वास्तव व शुद्ध चरित्र व चित्र असलेले संदर्भ पुराव्यासह अधिकृत पुस्तक छापून प्रकाशित करणे.
५) दि.28 जानेवारी 2021चा 25 वा म्हणजे रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा भव्य-दिव्य स्वरूपात करणे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली येथे किंवा 2000 स्वंयमसेवक घेऊन जाऊ शकेल असे समुद्री जहाज (क्रुझ) भाड्याने घेऊन समुद्री प्रवास करत बाहेर देशात वर्धापन दिन साजरा करणे. वर्धापन दिन सोहळा दिल्ली किंवा कोणत्या बाहेर देशात होणार त्याची अधीकृत घोषणा दि.29 नोव्हेंबर 2020 रोजी कपिलधार येथे होणाऱ्या 25 व्या रौप्य महोत्सवी वार्षिक मेळाव्यात करणे.
वरील प्रमाणे दिलेली 5 संकल्प म्हणजेच शिवा संघटनेच्या 25 व्या रौप्यमहोत्सवी वर्षात “पंचसूत्री” ची आमलबजावणी करण्यासाठीची माहिती देणे आणि कोरोना महामारीच्या संकटामुळे शिवा संघटनेचा “महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा रद्द केल्याची घोषणा करून सर्वांनी अक्षय तृतीया रविवार दि. 26 एप्रिल 2020 रोजी सकाळी आप-आपल्या घरीच बरोबर सकाळी 10 वाजता कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत हात जोडून शिवा संघटनेच्या पद्धतिने अभिवादन करावे. व याचे सर्व फोटो सकाळी 11 वाजेच्या अगोदर शिवा सोशल मीडियाच्या. माध्यमातून फेसबुक व व्हाटसपवर शेअर करून एकजुटीचे वादळ निर्माण करावे असे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी सर्वांना “आॅनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सींग” द्वारे 40 बैठका घेऊन केले आहे.
यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांच्या एकुण 40 बैठका V.C. द्वारे घेण्यात आल्या आहेत. एका बैठकीला 50 पदाधिकारी या प्रमाणे 40 बैठकीतून सुमारे 2000 शिवा पदाधिकाऱ्यांन सोबत V.C. द्वारे संवाद साधुन बैठका घेऊन मा.प्रा.मनोहरजी धोंडे सर यांनी मार्गदर्शन केले असुन प्रत्त्येक पदाधिकाऱ्यांनी किमान 25 कुटुंबास संपर्क करावा याप्रमाणे सुमारे 50 हजार घरांमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी 26 एप्रिल रोजी बरोबर सकाळी 10 वाजता “महात्मा बसवेश्वर” यांना जयंती निमित्त “सामुहिक अभिवादन” करून सोशल मीडियावर फोटो पाठविण्यात यावेत असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
तरी या महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त आप-आपल्या घरातून सामुहिक अभिवादन सोहळ्यात लाखो समाज बांधवांनी सहभागी व्हावे व जास्तीत जास्त समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवहन करावे हि विनंती.
मनिष आप्पा पंधाडे
प्रदेश अध्यक्ष-शिवा सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य,
पंधाडे कॉर्नर,बुलडाणा.
9225722655