Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : पत्नी लॉकडाऊन मध्ये अडकल्याने , सततच्या आठवणीने व्याकुळ पतीची आत्महत्या…!!

Spread the love

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एका व्यक्तीने पत्नीचा विरह सहन न झाल्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लॉकडाउन असल्याने ही व्यक्ती आपल्या पत्नीला भेटू शकत नव्हती असे सांगितले जात आहे. माहेरी असणाऱ्या आपल्या पत्नीची या व्यक्तीला सतत आठवण येत होती. शेवटी विरह असह्य झाल्याने या व्यक्तीने पाऊल उचलले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या विषयी पोलिसांनी सांगितले कि , राकेश सोनी (३२) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो गोंडा येथील राधा कुंडचा रहिवासी आहे, असे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. राकेश यांची पत्नी सोनी या लॉकडाउन घोषित होण्यापूर्वीच कोणत्यातरी कामानिमित्त माहेरी गेल्या होत्या. २५ मार्च या दिवसापासून संपूर्ण देशभर लॉकडाउन घोषित करण्यात आले आणि सोनी यांना माहेरीच राहावे लागले, असे पोलिसांनी सांगितले. आपली पत्नी घरी परतू शकत नसल्याने राकेश हे त्रस्त झाले होते. राकेश यांना आपल्या पत्नीची सतत आठवण येत होती. मात्र, बुधवारी त्यांना विरह सहन झाला नाही आणि त्यांनी सिलिंग फॅनला फाशी घेत आत्महत्या केली, अशी माहिती पोलिस निरीक्षकाने दिली. राकेश हे गोंडा येथे एकटेच राहात होत, असेही सांगण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!