Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : कोरोनाचा ते चोरटे घेत होते असाही गैरफायदा , चोरीची बियर विकत होते २०० रुपयाला आणि अडकले पोलिसांच्या जाळ्यात !!

Spread the love

औरंगाबाद – पैठण शेवगाव रस्त्यावर २एप्रिल रोजी चोरीच्यामोटरसायकलवर जाणार्‍या रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारांना पैठण पोलिसांनी पकडल्यानंतर ग्रामीण गुन्हेशाखेच्या मदतीने तीनतोळे सोन्याची लगड आणि चोरीची मोटरसायकल जप्त करंत आॅक्टोबर २०१९मधील घरफोडी उघडकीस आणली.ही कारवाई ग्रामीण गुन्हेशाखा आणि पैठण पोलिसांनी संयुक्तरित्या पार पाडली.तर दुसर्‍या एका कारवाईत ३० मार्च २० रोजी रांजणगावपोळ यैथील बिअर शाॅपी फोडून १लाख ७९ हजारांचे बिअरचे बाॅक्स लंपास केल्याचा शिल्लेगाव पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा ग्रामीण गुन्हेशाखेने उघडकीस आणला.या प्रकरणात एक चोरटा १० हजारांच्या मुद्देमालासह गुन्हेशाखेच्या हाती लागला आहे.

कोरोना इफेक्टमुळे  २००रु.एक बिअर मिळंत असल्याचा सुगावा गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांना लागला. बिअर विक्रेत्याला पकडले असता तो रैकाॅर्डवरचा चोरटा निघाला.
२मार्च रोजी नगर जिल्हा हद्दीवर पैठण पोलिस ठाण्याचे पीएसआय सागडे कोरोना इफेक्टमुळे कर्तव्य बजावत असतांना एका पल्सरवर दोघेजण पैठण कडे यैतांना दिसले.पीएसआय सागडे यांनी दोन्ही मोटरसायकलस्वारांची चौकशी केली असता त्यांनी सिध्दार्थ उर्फ कमाठ चव्हाण(२०) आणि उमेश शेषन भोसले अशी नावे सांगितली.त्यांच्याजवळ असलेल्या मोटरसायकलवरचा क्रमांक बघुन मोबाईल अॅपवरुन मोटरसायकल मालकाला फोनवर संपर्क केला.तेंव्हा जानेवारी २० मधे संशयितांकडे असलेली पल्सर मोटरसायकल चोरी झाल्याचा गुन्हा गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल आहे.अशी माहिती उजेडात आली. म्हणून पीएसआय सागडे यांनी गुन्हेशाखेचे पीएसआय भगतसिंग दुलंत यांना फोन करुन वरील नावे वाॅंटेड यादी मधील आहेत का असे विचारताच दुलंत यांनी वरील दोघे आॅक्टोबर २०१९ मधे पैठणपरिसरातील रामनगर येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे सांगितले.

दरम्यान गुन्हेशाखेच्या पथकाने पैठणकडे जाऊन पीएसआय सागडे यांनी पकडलेल्या रेकाॅर्डवरच्या चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवतांच कमाठ चव्हाण आणि उमेश भोसले यांनी रामनगर मधे घरफोडी केल्याची कबुली दिली.व विहामांडवा येथील सोनाराला विकलेली तीन तोळ्याची लगड पोलिसांनी विहामांडव्यातून जप्त केली.या गुन्ह्यातील आणखी दोनसाथीदार सतोष रायभान भोसले आणि प्रदीप चव्हाण हैफरार आहेत. तर शिल्लेगाव येथील गुन्ह्यात रैकाॅर्डवरच्या पाच जणांनी रांजणगाव पोळ येथील बिअरशाॅपी फोडल्याची माहिती खबर्‍याने पोलिसनिरीक्षक फुंदे यांना दिली होती.बिअरशाॅपी फोडणार्‍या मधे धन्या पिटोर्‍या पिंपळै,डुढ्या दत्तू चव्हाण, दाद्या भिमा काळे, विशाल संजय चव्हाण आणि मारस्या त्रिभूवन यांचा सहभाग होता. त्यापैकी विशाल संजय चव्हाण ला २००रु.एक अशी बिअर विकतांना १० हजाराच्या बिअर बाॅक्स सोबंत पकडले. वरील दोन्ही कारवायापोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील अप्पर अधिक्षक गणेश गावडे, सहाय्यक पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पैठण पोलिस निरीक्षक भागिरथ देशमुख ,पीएसआय सागडे, भगतसिंग दुलंत, पोलिस कर्मचारी गफार पठाण, नवनाथ कोल्है, संजय काळे, प्रमोद खांडेभराड, श्रीमंत भालेराव यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!