Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : पैठणची नाथषष्ठीची यात्रा स्थगित, राज्यातही सतर्कता , डॉक्टरांच्या सुट्या तूर्त रद्द

Spread the love

पुण्यात कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काळजी घेतली जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने सरकारने तातडीने तयारी सुरु केली आहे. मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. सर्व हॉस्पिटल्समध्ये युद्ध पातळीवर तयारी करण्यात येत आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सरकारी हॉस्पिटल्समधल्या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. पुणे आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतही अजित पवारांनी बैठक घेऊन आढाला घेतला असून उपाययोजना करण्यात कुठलीही कसर ठेवू नका अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील लाखो नाथभक्तांना एकत्र आणणारी नाथषष्ठीची यात्रा स्थगित करण्याचा निर्णय औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. ‘करोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी एकत्र येणं योग्य नसल्यानं ही यात्रा स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयानं दिले आहेत. नाथषष्ठी यात्रा १४ ते १६ मार्च दरम्यान पैठण येथे भरणार होती. दरम्यान महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यांत सध्या यात्रांचे हंगाम सुरू झाले आहेत. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुढील काही दिवसांत यात्रा आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील नाथषष्ठी, मांगीरबाबा यात्रांचाही त्यात समावेश आहे. लाखो लोक या यात्रेनिमित्ताने एकत्र येत असतात.

सोमवारी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात ‘करोना’ व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. पूर्वतयारीनिमित्त आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी, घाटी अधिष्ठाता, आरोग्य उपसंचालक, पोलिस तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. मराठवाड्याच्या आठही जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात प्रत्येकी २ कोटी रुपये ‘करोना’ व्हायरसवरील उपचारासाठी राखून ठेवावेत,’ असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी दिले होते. मराठवाड्यातील जिल्हा शल्यचिकित्सक, एनआरएचएम अंतर्गतही रक्कम राखीव ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!