Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पेंन्शन लुबाडणार्‍या भामट्याला वृध्दाने केले पोलिसांच्या हवाली

Spread the love

औरंगाबाद- गेल्या ४ फेब्रूवारीला पेन्शन घेऊन घरी परतणार्‍या वृध्दाचे साडेसहा हजार रु.लंपास करणार्‍या भामट्याला बरोबर एक महिन्याने प्रसंगावधान राखत नातवाच्या मदतीने वृध्दाने भामट्याला पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी वेदांतनगर  पोलिसांनी भामट्या विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करंत अटक केली आहे. शफीकखान रफीकखान असे अटक आरोपीचे नाव आहे.

गेल्या ४ फेब्रूवारी रोजी क्रांतीचौक परिसरातील रमानगरात राहणारे सांडू धर्मा हिवराळे(७५) हे सेवानिवृत्त कर्मचारी अदालत रोडवरील महाराष्र्ट बॅंकेत पेंन्शन काढण्साठी गेले होते. सात हजार रु.बॅंकेतून काढल्यानंतर नातवांसाठी मिठाई घेऊन घरी परतत असतांना MH20BT 6296 चा रिक्षाचालक शफीकखान ने सांडू हिवराळे यांना कुठे जायचे असे विचारत रिक्षात बसवले व उस्मानपुरा मार्गे इटखेडा येथील निर्जन परिसरात नेत मारहाण करंत त्यांचे साडेसहा हजार रु.घेऊन पसार झाला. या घटनेने डगमगून न जाता सांडू हिवराळे यांनी रिक्षाचा क्रमांक नोंदवून घेतला. आज तीन मार्च रोजी पुन्हा सांडू हिवराळे पेन्शन घेण्यासाठी बॅंकेत आले होते.या वेळी त्यांनी नातू प्रतिक यास बरोबर आणले होते. आरोपी शफीकखान हा त्या ठिकाणी प्रवाशांची वाट पहात उभा होता.सांडू हिवराळेंनी रिक्षाचा क्रंमांक बघंत उपस्थित नागरिकांच्या मदतीने चोप देत आरोपी शफीकला पोलिसांच्या हवाली केले. पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांतनगर पोलिस पुढील तपास करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!