Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वाहनचोरी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून विशेष मोहीम

Spread the love

औरंगाबाद – शहरातील वाहनचोरी रोखण्यासाठी  जिल्हा मॅकेनिक संघटना आणि पोलिस आयुक्तालयातर्फे एक स्तूत्य  उपक्रम राबवला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डाॅ.नागनाथ कोडे यांनी दिली. दरम्यान चोरी झालेल्या वाहनांची माहिती लपवल्यास आयपीसी कलम १७६ प्रमाणे एक महिना साधी कैद आणि ५०० रु. दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. तर सी.आर.पी.सी. कलम ४३ मधे केवळ गुन्हा लपवल्याची नोंद घेतली जाते, अशी माहितीही देण्यात आली आहे.

शहर जिल्हा मॅकेनिक असोशिएशनचे शहर जिल्हाध्यक्ष सय्यद चाॅंद सय्यद रमजान यांनी संघटनेच्या काही प्रमुख पदाधिकार्‍यांसोबंत आज सहाय्यक पोलिस आयुक्त डाॅ.कोडे यांची भेट घेतली.या बैठकीत पोलिसांकडून मॅकेनिक संघटनेला काही सूचना करण्यात आल्या आहेत. गाडी सर्व्हीसिंग ला टाकल्यानंतर ग्राहकाला तताबडतोब पावती द्यायची वाहन गॅरेजवर सोडण्यास आलेला व्यक्तीचे नाव मोबाईल नंबर नोंदवून घ्यायचे. त्यानंतर वाहन कोणाच्या नावावर आहे ते अॅपवर चेक करणे.व काही संशयित प्रकार आढळल्यास त्वरीत पोलिसांना संपर्क करणे. तसेच मॅकेनिक संघटना आणि पोलिस अधिकार्‍यांचा एक व्हाॅटसअॅप ग्रुपही  तयार करण्यात येणार आहे.अशा सूचना दिल्या याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसोबंत येत्या १२ मार्च रोजी पोलिस आयुक्तालयात  मॅकेनिक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वरिष्ठ पोलिस अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.असेही डाॅ.कोडे म्हणाले.

शहरात गेल्या दोन वर्षात  वाहनचोरी झाल्याचे गुन्हे पोलिसांच्या म्हणण्यानुसार १४९० वाहन चोरीचे गुन्हे शहरात दाखल झाले होते.त्या पैकी ३४१गुन्हे उघंड झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर अघंडकीस येण्याचे प्रमाण केवंळ २४टक्केच आहे. या नव्या उपक्रमामुळे वाहनचोरी रौखण्यात नक्की यश येईल असे डाॅ.कोडे म्हणाले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!