Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रेमास नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पेटवून दिले ….

Advertisements
Advertisements
Spread the love

आंध्र प्रदेश , तेलंगणातील दिशा कायद्याची चर्चा होत असतानाच तेलंगणात महाराष्ट्रातल्या हिंगणघाटमधील घटनेप्रमाणेच  आपल्या प्रेमाला नकार दिला म्हणून चिडून एका नराधमाने अल्पवयीन  मुलीवर बलात्कार करून एवढंच नाही तर त्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. घरात ही मुलगी एकटी असताना हे कृत्य घडल्याचे वृत्त आहे. मुलीने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांच्या लक्षात आले  आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

Advertisements

या घटनेत मुलगी ५० टक्के भाजली आहे.  तेलंगणमध्ये. सूर्यपेट जिल्ह्यात एका गावात ही भयंकर घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षांचा तरुण या पीडित मुलीला माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं सांगत त्रास देत होता. या मुलीच्या मागे लागणं बंद कर आणि तिचा नाद सोडून दे असं मोठ्यांनी त्याला बजावलं होतं. पण तरीही त्यानं ऐकलं नाही. अखेर ही मुलगी घरात एकटी  असल्याचे  पाहून तो तिच्या घरी गेला. तिला बळजबरीने घराजवळच्या झुडपांकडे नेलं आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडितेच्या घरच्यांनी केला आहे. या पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या मुलाविरोधात खुनाचा प्रयत्न, बलात्कार आणि पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला होता. पण  असून पोलीस तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!