Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हवा दिल्लीची । निवडणूक निकाल २०२० : दिल्लीत पुन्हा “पहले आपच ” अरविंद केजरीवाल यांचे कम जोरदार बॅक …

Spread the love

अशी आहे आघाडी

आप – 62

भाजप – 08

काँग्रेस – 00

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या  मतमोजणीला सुरुवात झाली असून दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार येणं जवळपास निश्चित; आपला ५३ जागांवर आघाडी, दिल्लीच्या सर्व ७० जागांचे कल हाती; आप ५३, भाजप १६ आणि काँग्रेस १ जागेवर पुढे आहे. सकाळी ८.०० वाजता मतांच्या मोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी सर्वात अगोदर मोजणी होत आहे ती पोस्टल मतांची… दिल्लीत प्रत्येक मतमोजणी केंद्रावर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय. दिल्लीमध्ये सत्ताधारी पक्ष असलेला ‘आप’ पुन्हा सत्तेवर येणार की भाजप यश मिळवण्यात यशस्वी ठरणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. गेल्या २० वर्षांचा राजनैतिक वनवास संपवून भाजप राज्यात सत्तेत परतणार, असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत. परंतु, तब्बल १५ वर्ष सत्तेवर असलेल्या काँग्रेसला मात्र याची खात्री देणं कठिण आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी घेतली निर्णयायक आघाडी. हॅट्रीक करणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून त्यांच्याविरोधात भाजपानं सुनील कुमार यादव यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं रोमेश सबरवाल यांना मैदानात उतरवलं आहे. केजरीवालांनी दोन्ही उमेदवारांना मागे टाकलं आहे. मतमोजणीच्या सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये केजरीवाल यांनी तब्बल २० हजार मतांची आघाडी घेतली आहे.

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत व्यक्त करण्यात आलेल्या वेगवेगळ्या एजन्सीच्या अंदाजात आपला सर्वात जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या दिल्ली विधासभेत ‘आप’च्या कार्यकर्त्यांत मोठा उत्साह दिसून येतोय. एक्झिट पोलनुसार आपल्या कामाच्या जोरावर राज्यात पुन्हा एकदा सत्तास्थापना करण्यासाठी ‘आप’ यशस्वी ठरणार, असाच अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली २०१५ साली दिल्ली विधानसभेत नव्यानंच राजकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या आम आदमी पार्टीनं ७० पैंकी तब्बल ६७ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर १५ वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसला मात्र या निवडणुकीत खातंही उघडता आलं नव्हतं. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी २०२० रोजी मतदान पार पडलं. यावेळी ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद करण्यात आलीय. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी रोजी संपणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. सर्व कौल हाती आले असून, दिल्लीकरांनी पुन्हा ‘आप’ला सत्तेत बसवलं आहे. प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपाला अपयश आलं आहे. तर काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा पराभव येणार असल्याचं दिसत आहे. कौल हाती आल्यानंतर ‘आप’चं कार्यालय सज्ज झालं आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!