Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

टिकटॉकवर शेजारच्या मुलीसोबत व्हिडीओ बनवला , मुलीच्या घरच्यांनी काढली तरुणाची विवस्त्र धिंड …

Advertisements
Advertisements
Spread the love

राजस्थानच्या जयपूर मध्ये शेजारच्या मुलीबरोबर टिकटॉक व्हिडीओ करणाऱ्या एका युवकाला मुलीच्या  कुटुंबीयांनी निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाला विवस्त्र करून मारहाण करताना या प्रसंगाची व्हिडिओ शूटिंगही करण्यात आली. त्यांनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या युवकाने शेजारी राहणाऱ्या एका १४ वर्षीय तरुणीसोबत एक व्हिडिओ बनवून को टिकटॉकवर अपलोड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी युवकाला मारहाण केली आणि त्याला विवस्त्र होण्यास भाग पाडले. त्यानंतरही त्याला मारहाण केली गेली, अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त मनोज चौधरी यांनी दिली. मुलीने या युवकाविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

Advertisements

जयपूरमधील जवाहरनगर भागात ही घटना घडली. या युवकाने एका अल्पवयीन मुलीसोबत टिकटॅक व्हिडिओ तयार केला. हा युवक आणि ही अल्पवयीन मुलगी एकमेकांचे शेजारी आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मुलीचे कुटुंबीय संतापले. त्यानंतर या मुलीच्या वडिलांनी आणि त्यांच्या भावांनी इतर काही लोकांना सोबत घेतले आणि त्या युवकाला मारहाण केली. त्यानंतर त्याला निर्वस्त्र करण्यात आले. या युवकाचे कपडे काढून टाकल्यानंतर त्याला त्याच अवस्थेत त्याला परिसरात फिरवले गेले. इतकेच नाही, तर त्याला फिरवत असताना त्याला पट्ट्याने मारहाणही करण्यात येत होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान यानंतर पीडित युवकाच्या नातेवाईकांनी मारहाण, तसेच विवस्त्र केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर, मुलीच्या कुटुंबीयांनी या युवकाविरुद्ध पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!