Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची पोलिसात तक्रार

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि एका वेब पोर्टल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खांबिया यांनी ही गंभीर तक्रार दाखल केली आहे

Advertisements

याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि , ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार यांच्या हत्येची चिथावणी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागील काही महिने समाज माध्यमांवर टोकाच्या विद्वेशाची भावना पसरवणे, तसेच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय ऐक्याला तडा जाईल , अशा अनेक पोस्टर सोशल मीडियावर पाहत आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यानंतर हा प्रकार कमी होईल, असं वाटत होतं. त्यामुळे याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचे खाबिया यांनी म्हटले. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पत्रकार भाऊ तोरसेकर आणि इतरांकडून सातत्याने युट्यूब, पोस्टमन पोर्टल आदी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचेही  निदर्शनास आले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!