Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंगणघाट जळित प्रकरणातील पीडितेची प्रकृती अद्याप चिंताजनक , ताज्या मेडिकल बुलेटिनमध्ये खुलासा

Spread the love

वर्ध्याच्या हिंगणघाट येथी शिक्षिका जळीतकांडातील पीडितेची प्रकृती खालावली असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ताज्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली आहे. दरम्यान पीडितेचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असून सध्या या तरुणीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात ही तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. आज या पीडितेवर एक अतिशय महत्वाची शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी ठरवले होते. मात्र, पीडितेची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया आज न करता ती उद्या किंवा योग्य वेळी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान पीडितेचा गुरुवारी रक्तदाब वाढला होता. त्यानंतर जंतूसंसर्गाचा धोका लक्षात घेता ऑरेंज सिटी रुग्णालयाने अतिदक्षता विभागातील सर्व ७ रुग्णांना इतरत्र हलविले होते. या ठिकाणी केवळ एकट्या पीडितेलाच ठेवण्यात आले आहे. हा वॉर्ड जळीत प्रकरणातील पिडीत तरुणीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी तिचा रक्तदाब स्थिर झाल्याने तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. या घडामोडीत भाजलेल्या तिच्या शरीरावरी जखमांचेही निर्जंतूकीकरण करण्यात आले. सोबतच या तरुणीच्या जखमांवरही ड्रेसिंग रोज बदलले जात आहे.

पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले कि , पिडीत तरुणीच्या शरिराचा ३५ टक्क्यांहून अधिक भाग भाजला आहे. तिच्या कमरेच्या वरील भाग आगीमुळे भाजल्याने श्वासनलिका, अन्ननलिका देखील भाजून निघाली आहे. त्यामुळे पीडितेला सध्या जंतूसंसर्गाचा मोठा धोका आहे. तिला हा संसर्ग होऊ नये यासाठी संपूर्ण अतिदक्षता विभाग रिकामा करण्यात आला असून जंतूसंसर्ग तज्ज्ञ डॉ. अश्विनी तायडे, अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉ. राजेश अटल, बर्न स्पेशालिस्ट डॉ. अनिल केसवानी, डॉ. नुरूल अमिन तिच्या प्रकृतीवर बारिक लक्ष ठेवून आहेत.  दरम्यान ऑरेंजसिटी रुग्णालयात तरुणीची प्रकृती जाणून घेण्यासाठी राजकीय पुढारी, तसेच कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. पीडितेच्या उपचारामध्ये कुठलीही अडचण येऊ नये यासाठी राज्य सरकार तिला ‘मनोधैर्य’ योजनेतूनही संपूर्ण सहाय्य करीत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!