Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारतीय रेल्वेची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल , या मार्गावर धावणार १५० खासगी रेल्वे

Spread the love

भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा घाट मोदी सरकाने घातला असून त्यासाठी  भारतीय रेल्वेने १०० रेल्वे मार्गांची पाहणी केली आहे. लवकरच या मार्गावर १५० खासगी रेल्वे धावणार असून या मार्गांसाठी पुढील महिन्यांपासून खासगी कंपन्या बोली लावण्याची शक्यता  रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या माहितीत वर्तविली आहे.

याबाबत प्रसिद्ध वृत्तात म्हटले आहे कि , अर्थ मंत्रालयाने १९ डिसेंबर रोजी पब्लिक प्रायव्हेट अप्रेजल कमिटी (PPPAC) कडून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर खासगी रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशभरात १०० रेल्वे मार्गावर १५० खासगी रेल्वे धावणार असून यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांची निवड केली आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. मुंबई-कोलकाता, मुंबई-चेन्नई, नवी दिल्ली-मुंबई, तिरुवनंतपूरम-गुवाहाटी, नवी दिल्ली-कोलकाता, नवी दिल्ली-बेंगळुरू, नवी दिल्ली-चेन्नई, कोलकाता-चेन्नई. चेन्नई-जोधपूर या मार्गांचा समावेश आहे. तसेच, या प्रमुख मार्गांपैकी मुंबई-वाराणसी, मुंबई-लखनऊ, मुंबई-नागपूर, नागपूर-पुणे, सिंकदराबाद-विशाखापट्टणम, पाटणा-बेंगळुरू, पुणे-पाटणा, चेन्नई-कोईबंतूर, चेन्नई-सिंकदराबाद, सूरत-वाराणसी, भुवनेश्वर-कोलकाताचा समावेश आहे.

याशिवाय नवी दिल्ली हून पाटणा, अलाहाबाद, अमृतसर, चंदीगड, कटरा, गोरखपूर, छपरा व भागलपूरचाही  समावेश आहे. १०० मार्गापैकी नवी दिल्लीहून ३५, मुंबईतून २६, कोलकाताहून १२, चेन्नईहून ११ आणि बेंगळूरूहून ८ मार्ग कनेक्ट होणार आहेत. हे सर्व शहर महानगर आहेत. अन्य काही महानगर नसलेल्या शहरातही हे रेल्वेमार्ग जोडण्याचा विचार सुरू आहे. यात गोरखपूर-लखनऊ, कोटा-जयपूर, चंदीगड-लखनऊ, विशाखापट्टणम-तिरुपती आणि नागपूर-पुणे या शहराचा समावेश आहे. खासगी रेल्वेच्या मार्गासाठी पाहणी करणे सुरू आहे. खासगी कंपन्यांना बोली लावण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. भारतीय रेल्वेसाठी हा मैलाचा दगड असणार आहे, असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!