Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड

Spread the love

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडून जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून मोहन जोशी आणि जब्बार पटेल यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळत होती. अखेर डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मोहन जोशी आणि जब्बार पटेल यांच्यावरून  दोन गटही तयार झाले होते. या दोघांना मतदान करण्यासाठी त्यांच्या समर्थकांचे  संपर्क अभियानही  सुरु झाले होते. त्यातच कार्यकारिणीने आधीच नाव जाहीर केल्यामुळे नियामक मंडळ नाराज होते . परिणामी  आगामी नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी निवडणुकीचे नाट्य रंगणार असे  चित्र तयार झाले होते.

आता मात्र शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाची निवड झाली असल्याने या संपूर्ण वादावरुन पडदा पडला आहे. आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडून जब्बार पटेल यांचे नाव जाहीर करण्यात आले. दरम्यान, हिंदी आणि मराठीतील डॉ.जब्बार पटेल हे मोठं नावं आहे. त्यांची नाट्यसंमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे रंगकर्मींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. जब्बार पटेल यांनी अनेक नाटक आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्यात ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘एक होता विदूषक’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, संविधानाचे शिल्पकार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचाही प्रवास त्यांनी दिग्दर्शित केला आहे. प्रायोगिक नाट्य चळवळीसाठी त्यांनी थिएटर अकादमी ही संस्थाही स्थापन केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!