Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बिर्याणी विकणाऱ्या मागासवर्गीय तरुणाला , बिर्याणी का विकतो ? म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण , व्हायरल व्हिडीओवरून गुन्हा दाखल

Spread the love

https://twitter.com/ANINewsUP/status/1206071393214853120

ग्रेटर नोएडाच्या मोहम्मदाबाद राबुपुरा भागात रस्त्याच्या कडेला शाकाहारी बिर्याणी विकून उपजीविका भागविणाऱ्या एका तरुणाला तो मागासवर्गीय असल्याचे समजल्याने त्याला अमानुष मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिर्याणी विकणाऱ्या या तरुणाजवळ जात काहींनी त्यांची जात विचारली. त्यावर तो मागासवर्गीय असल्याचे समजताच ग्राहक बनून आलेल्या तरुणांनी बिर्याणी विक्रेत्या तरुणाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ करून तो त्यांनीच व्हायरल केला. हा व्हिडीओ निदर्शनास येताच  पीडित तरुणाने त्या आधारे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांविरुद्ध मारहाण केल्याबद्दल आणि ऍट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गौतम बुद्ध नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक रणविजय सिंग यांनी दिली आहे.

लोकेश असे या पीडित तरुणाचे नाव असून तो आंबेडकर नगरात राहतो. लोकेश हा शाकाहारी बिर्याणी विकण्याचे काम करतो. लोकेश शुक्रवारी मोहम्मदाबाद खेडा गावात बिर्याणी विकत होता. त्यावेळी गावातील काही तरुण त्याच्या जवळ आले. या तरुणांनी लोकेशकडून बिर्याणी विकत घेतली आणि खात असताना लोकेशसची जात विचारली. लोकेशने आपण मागासवर्गीय  असल्याचे सांगितले. हे ऐकताच बिर्याणी खात असलेल्या तरुणांनी आपल्या हातातील बिर्याणी फेकून दिली आणि लोकेशला मारहाण करणे सुरू केले. मारहाण करताना या तरुणांनी लोकेशला जातीवाचक शिवीगाळही केली.

जे तरुण लोकेशला मारहाण करत होते, त्यातील एकानेच मारहाणीचा हा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर त्याने फेसबुकवर शेअर केला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!