Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बॅग पळविणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

औरंंंगाबाद : सिल्लोड शहरातून व्यापा-याची बॅग लंपास करणा-या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीत २ पुरूष व २ महिला असून ताब्यातून पोलिसांनी १० मोबाईल, दोन दुचाकी, सोने-चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एवूâण १ लाख ९१ हजार २०० रूपये किमतीचा  मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण रामु बोगी (वय २०, रा.गोलगुमटा, कर्नाटक), सुर्या उफ गणेश रमेश बेस्तर (वय २५, रा.आळंद चेकपोस्ट, रामतिर्थ मंदिर, जि.गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्या चोरट््यांची नावे आहेत. ३० नोव्हेंबर रोजी सिल्लोड शहरातील व्यापारी राजकुमार घनश्याम कटारिया यांच्या दुकानातून चोरट्यांनी १ लाख ५ हजार रूपये ठेवलेली बॅग लंपास केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयावरून बीड बसस्टँड जवळ पाल टाकून  राहत असलेल्या कल्याण रामु बोगी व गणेश रमेश बेस्तर व सोबतच्या दोन महिलांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी सिल्लोड शहरातून राजकुमार कटारिया यांची बॅग चोरी केली असल्याची कबूली दिली.

ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, सहाय्यक फौजदार सुधाकर दौड, जमादार गणेश मुळे, विठ्ठल राख, विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव, सुनिल खरात, नामदेव सिरसाट, सुनिल शिराळे, दिपेश नागझरे, किरण गोरे, अनिल चव्हाण, योगेश तरमाळे, जिवन घोलप, बाबासाहेब नवले, संजय तांदळे आदींच्या पथकाने केली.


राज्यात विविध ठिकाणी केले बॅग चोरीचे गुन्हे
ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केलेल्या टोळीने जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर सांगली, बुलढाणा, सिंदखेड राजा आदी ठिकाणी बॅग चोरीचे गुन्हे केले आहेत. बॅग चोरी करण्यापुर्वी ते व्यापाNयावर पाळत ठेवत होते. दुकानाच्या कुलूपामध्ये पेâव्हीकॉल व काड्या टावूâन दुकानदाराचे लक्ष विचलीत झाल्यावर बॅग चोरी करीत होते.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!