Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : जवाहरनगर पोलिसांचा रस्त्यावर राडा, विद्यार्थ्यांला मारहाण, कारच्या काचा फोडल्या, खाली पाडून अंगावर केली लघुशंका

Spread the love

महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. पोलिसांच्या ब्रिद वाक्याचा असा अर्थ असला तरी रविवारी मध्यरात्री जवाहरनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनी प्रतापच केला. पोलीस विभागाच्या ब्रिदवाक्याच्या उलट पोलीस अधिकारी-कर्मचारी वागत होते. स्वत:ला चालता येत नव्हते, अशा मद्यधुंद अवस्थेत पोलीस होते. यातच रस्त्याने जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर चोरीचा आरोप करत त्याच्या पलंगाची मोडतोड, रस्त्याने शिवीगाळ, कारच्या काचा फोडणे. ऐवढेच नव्हे तर एका तरुणाला रस्त्यावर खाली पाडून त्याच्या अंगावर लघुशंका करण्यासारखा गंभीर प्रकार उत्तमनगर-विष्णूनगर रोडवर घडला.

या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली असून या बाबतचा अहवाल प्राप्त होताच दोन्ही पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल.अशी माहिती पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दिली.

जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रगटीकरण पथकामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार बोटके आणि पोलीस कर्मचारी हिवाळे हे रात्री जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या एका बिअरबारमध्ये रविवारी (दि.१७) दारू पिण्यासाठी बसले. त्याठिकाणी दारू रात्री साडे बारा वाजेपर्यंत दारू पित बसले. दारू पिल्यानंतर ते रस्त्यावर आले. त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी रस्त्यावर येतात. त्यांनी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली. पोलीस अशा पद्धतीने का वागत आहेत म्हणून बाजूबाजूचे नागरिक-तरूण जमा झाले. रस्त्यावर कोणाचा धिंगाना सुरू झाला हे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. तर दोन पोलीस कर्मचारी रस्त्याने दारू पिवून धिंगाना करत चालले होते. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर त्यांनी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पकडले.

विद्यार्थ्यांचा पलंग तोडला :
एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने खोली बदलल्यामुळे तो रात्रीच्या वेळी सामान एका खोलीतून दुसऱ्या खोलीत नेत होता. दोन्ही पोलीस कर्मचारी दारू पिवून रस्त्यावर आल्यावर त्यांना त्या विद्यार्थ्याला पकडले. चोरीचा पलंग घेऊन कुठे चालला, असे म्हणून त्याला काही उत्तर देण्याच्या आत त्यांच्या अंगावर हात टाकला. त्यांच्या पलंगाला लाथा मारल्या. त्या विद्यार्थ्याचा पलंग तोडल्यावर तेथून निघून पुढे गेले.

कारच्या काचा फोडल्या :
रस्त्याने जाताना शिविगाळ करत असताना दोघांनी एका कारच्या साईड ग्लासच्या काचा फोडल्या. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवून त्यांना मारहाण करत आकाशवाणीच्या दिशेने हे दोघे जात होते.

दरम्यान या प्रकरणात  अहवाल प्राप्त होताच दोन्हीही पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येतील असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!