Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : बनावट कागदपत्राआधारे जामीन घेणारे आणखी तिघे गजाआड

Spread the love

औरंंंगाबाद : बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून जामीन घेणार्‍या टोळीचा पदार्फाश गेल्या आठवड्यात गुन्हे शाखा पोलिसांनी केला होता. या टोळीतील आणखी तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी (दि.१३) गजाआड केले. नसीर खान नियाज खान (वय २६), शेख इब्राहीम शेख इस्माईल (वय ६०) दोघे रा. संजयनगर, बायजीपुरा, सलमा नाहेद मशकुरोद्दीन बियाबानी (वय ४२, रा. नेहरुनगर, कटकटगेट) अशी नव्याने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आणि एपीआय अजबसिंग जारवाल यांचा कारवाईत महत्वाचा सहभाग आहे. पोलिस निरीक्षक  सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अधिक तपस करीत आहे.

बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, एैपत प्रमाणपत्र (सॉलव्हन्सी), सातबारा तयार करून ते न्यायालयात सादर करून अटकेतील आरोपींचा जामीन घेणार्‍या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केले होते. या टोळीचा मास्टरमाईंड असलेल्या शेख मुश्ताक शेख मुनाफ (वय ३६, रा. हिनानगर, रशीदपुरा) याच्यासह ११ आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपल्यावर सर्व ११ जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांना शनिवारपर्यंत (दि.१६) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम.एस.काकडे यांनी दिले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!