Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंकजच्या विरोधात व्हायरल केलेली क्लिप खरी नाही , सिद्ध झाले तर जीवन संपवून टाकीन : आणि धनंजय मुंडे भावनाविवश झाले !!

Spread the love

राखी बांधणाऱ्या बहिणीबाबत मी कधीही खालच्या थराला येऊन असले विधान करणार नाही, मात्र नव्याने दाखल झालेले भाऊ मला खलनायक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करून माझे समाजातील अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मुंडे म्हणाले. या मागे जो कुणी असेल त्याला शोधून काढण्यासाठी आता आपण या प्रकरणाच्या खोलात जाणार असल्याचेही ते म्हणाले. या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले. ग्रामविकास मंत्री आणि आपली बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात आपण आक्षेपार्ह विधान केले हे सिद्ध केल्यास मी माझे जीवनच संपवून टाकीन, असे म्हणत आमच्या बहीण-भावाच्या नात्यात कुणीतरी विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा उलट आरोप धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

धनंयज मुंडे यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांतर राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत धनंजय मुंडे यांना नोटीस धाडली आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही व्हिडिओ क्लिप एडिट करून तयार करण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. ही व्हिडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये नेऊन तपासावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. निवडणुकीच्या राजकारणात आपण कधीही खालच्या पातळीवर जाऊन कुणाच्या मनाला लागेल असे कधीही बोललो नसल्याचेही ते म्हणाले.

धनंजय मुंडे म्हणाले कि , मी जे काही बोललो ते माझ्या बहिणीसंदर्भात बोललो नव्हतो. पण नव्याने दाखल झालेले भाऊ या नात्यात विष कालवण्याचे काम वाहिन्यांवर येऊन करत आहेत असा थेट आरोप मुंडे यांनी महादेव जानकर यांचे नाव न घेता केला. निवडणूक जिंकायची असेल तर लोकांच्या मनात स्थान निर्माण करून जिंकण्याचा प्रयत्न करा, मात्र मला खलनायक करून निवडणूक जिंकून नका, असे थेट आरोपवजा आवाहन मुंडे यांनी यावेळी केले. अशा प्रकारचा आरोप झाल्यानंतर मला असे वाटत आहे की हे जग सोडून जावे. हा जो काळा डाग माझ्यावर लावण्यात आला आहे आणि माझ्यासारख्या भावावर असा अभद्र आरोप केला जात असेल, तर असे राजकारणही नको आणि हे जीवनही नको, असे उद्विग्न होऊन धनंजय मु़ंडे म्हणाले. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते. मला ही सहा बहिणी आहेत, तीन मुली आहेत. वाईट या गोष्टीचे वाटते की ज्या घरात बहुसंख्येने महिलांचा वावर आहे, अशा घरातील माझ्या सारखी व्यक्ती महिलेचा अपमान करू शकणार नाही असे म्हणत जनमानसात मला का संपवायचा प्रयत्न होत आहे, मी असं काय केलंय, असे सवालही त्यांनी उपस्थित केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीव हे शेवटचे अस्त्र वापरून मला कुणी डाग लावण्याचा प्रयत्न केला याच्या खोलात आपण नक्की जाणार असेही ते म्हणाले.

माझ्या भाषणाची क्लिप पूर्ण ऐकली असती तर असे झाले नसते. बहीण-भावाच्या नात्यात विष कालवण्याचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे.  मी तसे बोललो असेन तर जा आणि फॉरेनसिक लायब्ररीत जाऊन तपासणी करा. पोलीसांनी याची तपासणी न करताच माझ्यावर गुन्हा दाखल केला. ज्या निवडणूक प्रतिनिधींनी माझे भाषण संपादन करून वेगळेच भासवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात ४६ कलमाखाली आपण रात्री फिर्याद दाखल केली. मात्र पोलिसांनी दाखल करून घेतली नाही, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी आता जनताच न्याय देणार असून आपण या सर्व गोष्टी मी जनतेपुढे ठेवत असल्याचेही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!