Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धंनजय मुंडे यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल , परळी मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत

Spread the love

मराठवाड्याच्या राजकारणातील भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची आहे. दोघेही बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पंकजा मुंडे या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. परळीतील जनता कोणाला साथ देते पाहणे उत्सुकतेचे आहे. काल पंकजा मुंडे यांना सभेत भोवळ आल्याने दोघांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या असून या प्रकरणात धंनजय मुंडे यांना भाजपकडून चांगलेच टार्गेट केले जात आहे.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ५००, ५०९, , २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप  शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याची एक क्लिप परळी विधानसभा मतदारसंघात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये अत्यंत गलिच्छ व बिभत्स शब्द वापरले गेले आहेत. या क्लिपमध्ये टीका करणारा व्यक्ती हे धनंजय मुंडे असल्याचा आरोप आहे.

मतदार संघात व्हायरल झालेल्या ‘त्या’ क्लिपवरुन भाजपने महिला आयोग आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. या तक्रारीत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांनी प्रचार शृंखलेतील परळी विधानसभा मतदारसंघात शेवटची सभा घेतली. या सभेतील भाषण आटोपून परतताना पंकजा मुंडे यांना सभास्थळी अचानक भोवळ आली. त्या खाली कोसळल्या.

दरम्यान, भाजप नेते सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांना भोवळ येण्यास धनंजय मुंडे हेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ‘त्या’ व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये धनंजय मुंडे यांनी अत्यंत खालच्या पातळीला जात बिभत्स शब्द वापरण्यात आले होते. पंकजा मुंडे यांच्या भावनीक मनाला हे शब्द लागले. त्यामुळे तणावातून त्यांना भोवळ आली, असा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सुरेश धस यांनी केला.

https://www.facebook.com/DPMunde/posts/2501627076733574

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!