Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : भाजपकडून चार बंडखोरांवर कारवाई , शिवसेना मात्र संभ्रमात

Advertisements
Advertisements
Spread the love

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या भाजपच्या ४ कार्यकर्त्यांवर पक्षाने कारवाई करीत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार या चार जणांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती आज पक्षाकडून देण्यात आली आहे. शिवसेना मात्र बंडखोरांवर कारवाई करण्याबाबत संभ्रमात असल्याचे दिसत आहे.

Advertisements

चंद्रकांत पाटील यांनी भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या बंडखोरामध्ये तुमसरमधील चरण वाघमारे, मीरा भाईंदरमधील गीता जैन, पिंपरी चिंचवडमधील बाळासाहेब ओव्हाळ आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मतदारसंघातील दिलीप देशमुख या चार जणांचा यात समावेश आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Advertisements
Advertisements

भंडारा जिल्ह्यातील तुमसर मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना तिकिट देण्याऐवजी भाजपने प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिल्याने चरण वाघमारे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आहे. पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोर उमेदवारांनी आपला अर्ज मागे घ्यावा अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यातून तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांची माफी मागितली होती. फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतरही शिवसेना-भाजपमधील असंतुष्ट नेत्यांनी काही ठिकाणी बंडखोरी केली आहे.

शिवसेनेसमोरही बंडखोरांचे आव्हान असून दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्याच मतदारसंघात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेने सावंत यांचं तिकीट कापून या मतदारसंघातून महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट दिलं आहे. महाडेश्वर हे शिवसेनेचे सचिव अनिल परब यांच्या जवळचे असल्यानेच सावंत यांचा पत्ता कापल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी मात्र अद्याप पक्षने कुठलीही भूमिका घेतलेली नाही हे विशेष.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!