Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नारायण राणे यांचा भाजप प्रवेश निश्चित १५ ऑकटोबरला होईल प्रवेश

Spread the love

अखेर नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष येत्या १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये विलीन करण्यात येणार असल्याची माहिती स्वत: नारायण राणे यांनी दिली आहे. काही महिन्यांपासून भाजपात ‘मेगा भरती’ सुरू आहे. इतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, नारायण राणे यांचा भाजप प्रवेश निश्चित होत नव्हता. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर नारायण राणे यांनीच आपल्या भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा भाजप प्रवेश रखडला होता. या प्रवेशाला अखेर मुहूर्त लागला आहे. नारायण राणे राजन तेली यांच्या प्रचारासाठी सावंतवाडी येथे आलेले असताना ते पत्रकारांशी बोलत होते . यापूर्वीच नितेश राणे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. नारायण राणे भाजपचे सहयोगी खासदार असले तरी त्यांचा अद्याप भाजपा प्रवेश झालेला नाही. हा भाजप प्रवेश येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रवेशासोबत नारायण राणे आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलिन करणार आहेत.

मुख्यमंत्री कणकवलीत येऊन प्रचार काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कणकवलीत भाजप विरुद्ध सेना आमने-सामने आहेत. शिवसेनेच्या विरोधात मालवण आणि सावंतवाडी मतदार संघात अपक्ष उमेदवार उभे आहेत. त्यांना भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांचा जाहीर पाठिंबा आहे. भाजपा आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते शिवसेना उमेदवाराचा पराभव करण्यासाठी एकवटले आहेत.

कुडाळ मध्ये दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज छाननीतून बाद झाल्यानंतर त्यांच्या जागी नारायण राणे यांचे निकटवर्ती रणजित देसाई अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.भाजपचा त्यांना पाठिंबा आहे ..शिवसेनेचे वैभव नाईक आणि रणजित देसाई यांच्यात लढत होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .तेली यांना स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा आहे, कणकवलीत उघड उघड सेना-भाजप समोरासमोर ठाकले आहेत .नितेश राणे यांना भाजपची

उमेदवारी मिळाल्यानंतर लगेच शिवसेनेने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना उमेदवारी अर्ज देऊन राणेंना आपला असलेला विरोध नोंदवला तर सावंतवाडी आणि कुडाळमध्ये राजन तेली आणि रणजित देसाई यांना भाजपने उभे केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!