Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दुचाकी चोराला पकडल्याची गुन्हे शाखेची चमकोगिरी, ‘मार्केटिंग’ साठी श्रेय लाटण्याचा खटाटोप !!

Spread the love

जगदीश कस्तुरे । महानायक ऑनलाईन ।


शहरातून गेल्या वर्षभरात साडेसातशेवर दुचाकी व इतर वाहने चोरीला गेली आहेत. वाहने चोरीला जात असल्याने नागरिक भयभीत झालेले असताना गुन्हे शाखेचे पोलिस चोरांना पकडण्याचे सोडून चमकोगिरी व मार्केटिंगचे फंडे आजमावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहर पोलिस आयुक्तालयात एकमेकांवर कुरघोडी करण्यातच अधिकारी धन्यता मानत असल्याचे पुन्हा एकदा उजेडात आले आहे. एकीकडे सोशल पोलिसींगसाठी पोलिस आयुक्त दिवसरात्र एक करत आहे. मात्र, काही अधिकारी पोलिस आयुक्तांच्या स्वभावाचा आता गैरफायदा घेताना दिसत आहेत.


माझ्या समोर प्रेसनोट तयार करुन ठेवली. मी सही केली. ती कशी तयार केली याकडे आपण लक्ष दिले नाही.
डाॅ.नागनाथ कोडे : सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा


शहरात घरफोड्या, चो-या, मंगळसूत्र हिसकावणे, तोतया पोलिस, जबरी चोरी, वाहन चोरी याशिवाय अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत आहेत. गुन्ह््यांना आळा घालून त्यावर प्रतिबंध आणणे आणि गंभीर स्वरुपाच्या गुन्ह््यांचा तपास करण्याचे काम गुन्हे शाखेचे आहे. पण गेल्या काही दिवसांपासून शहर पोलिस दलात एकमेकांचे उणेदुणे काढण्यात आणि कुरघोडी करण्यावरच अधिकारी धन्यता मानताना दिसतात. वाहन चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. गुन्ह््यांची उकल करत असलेल्या अधिका-यांची पाठ थोपटण्याचे सोडून बाकीचे अधिकारी त्यांच्या विरोधात तोंडसुख घेताना दिसून येत आहेत. स्वत:ची मार्केटिंग करण्यासाठी काहींनी तर श्रेय लाटण्याचा खटाटोप सुरू केला आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याचे प्रभारी एकमेकांवरील नाराजी व्यक्त करत आहेत. त्यातच मार्केटिंगचा नवा फंडा आजमावण्यात आला आहे. पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांनी केलेल्या कारवाईचे श्रेय लाटून स्वत:ची मार्केटिंग केली जात असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.
………..
काय आहे नेमका प्रकार……
सध्या कर्णपुरा देवीच्या यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने त्याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदोबस्तादरम्यान, छावणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन मिरधे व त्यांच्या पथकाने ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकी चोर अभिषेक बापुराव सुडके (२५, रा. वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना) याला पकडले. त्याच्याकडून दुचाकी (एमएच-२२-वाय-१४३६) जप्त करण्यात आली. याबाबतची नोंद छावणी पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये करताना मिरधे यांनी अभिषेक सुडके याला पुढील चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या ताब्यात दिल्याचेही नमूद केले. मात्र, रविवारी रात्री गुन्हे शाखेकडून आपणच हा दुचाकी चोर पकडल्याची ‘मार्केटिंग’ करण्यात आली. त्यामुळे शहर पोलिस दलात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू असल्याचा प्रकार उघडपणे समोर आला आहे.
……….
पोलिस आयुक्तांची दिशाभूल……
पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद हे शांत स्वभावाचे आहेत. सर्वच पोलिस अधिकारी त्यांची स्तुती करतात. मात्र, काही अधिकारी त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेताना दिसून येत आहेत. स्वत:च्या बचावासाठी राजकीय दबाव देखील त्यांच्यावर काही अधिकारी त्यांच्यावर आणत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, आयुक्त प्रसाद यांनी पोलिस दलातील राजकारण मोडकळीस आणण्याची आता खरी गरज असल्याची चर्चा पोलिस दलात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!