Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Update : बेपत्ता मनोरुग्ण महिला नातेवाईकांच्या ताब्यात, पोलिसांची अशीही मानवता

Spread the love

औरंगाबाद : बेपत्ता महिलेची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल होताच जिन्सी पोलिसांनी शोध घेत महिलेला राजस्थानातून ताब्यात घेतले. यानंतर रविवारी तिला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. जिन्सी परिसरातील बबिता रामभाऊ गायकवाड (५०, रा. गल्ली क्र. २, कैलासनगर) या मनोरुग्ण आहेत.

काही दिवसांपुर्वी त्या बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्याबाबत राजस्थानातील एकाने सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल केला होता. तसेच त्याने स्वत:चा मोबाईल क्रमांक देखील त्यासोबत दिला होता. तर दुसरीकडे त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद जिन्सी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यावरुन जिन्सी उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, रफिक शेख, संपत राठोड, हारुण शेख, संजय गावंडे, धनंजय पाडळकर, सुनील जाधव व गणेश नागरे यांनी पाठपुरावा करुन बबिता यांना नातेवाईकांच्या मदतीने शहरात आणले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!