Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : सायकल चोरी करता करता घरफोड्या करणारा जेरबंद, ३ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त, पोलीस आयुक्तांनी केले पथकाचे कौतुक

Spread the love

औरंंंगाबाद : शहरातील देशी-विदेशी बनावटीच्या सायकल चोरी करता करता घरफोड्या करण्याकडे वळालेल्या घरफोड्यास उस्मानपुरा पोलिसांनी सोमवारी (दि.७) जेरबंद केले. चंद्रकांत विठ्ठल मगरे (वय ३५, रा.मुकुंदवाडी ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी जवळपास ३ लाख ७७ हजार रूपये किमतीच्या  ३१ सायकली व ६३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांनी दिली आहे. या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी हा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकाला १५ हजाराचे रिवॉर्ड देऊन कौतुक केले आहे.

चंद्रकांत मगरे हा गेल्या काही महिन्यापासून शहराच्या विविध भागातून देशी-विदेशी बनावटीच्या महागड्या सायकली चोरत होता. सायकल चोरी करता करता तो घरफोड्या करण्याकडे वळला होता. मगरे याने डॉ. सरोज रामलिंग बेबळकर-पांडे (रा.देवानगरी, उस्मानपुरा), रमाकांत कुलकर्णी (रा. कांचननगर, प्रतापनगर) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली होती. देशी-विदेशी सायकली चोरी करणारा चंद्रकांत मगरे हा उस्मानपुरा परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे, डीबी पथकाचे सहाय्यक फौजदार कल्याण शेळके, जमादार प्रल्हाद ठोंबरे, संतोष शिरसाट, संजयसिंग डोभाळ, मनोज बनसोडे आदींच्या पथकाने चंद्रकांत मगरे याला सापळा रचून अटक केली. चौकशी दरम्यान मगरे याने चोरी केलेल्या ३ लाख ७७ हजार रूपये विंâमतीच्या ३१ सायकली व ६३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने पोलिसांना काढुन दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!