Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabada Crime : ऑटो रिक्षातील सहप्रवाशांना लुटणारे अट्टल चोर २४ तासात पुंडलिकनगर पोलिसांकडून गजाआड

Spread the love

शहरात सध्या रिक्षातील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळी सक्रिय झाल्या आहेत. रेल्वे स्टेशन वरून प्रवाशी रिक्षात बसवून त्यांना लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्तीचे ५० हजार रुपये असाच पद्धतीने रेल्वेस्टेशन वरून रिक्षात जाताना लांबविणाऱ्या दोन लुटारूना पुंडलिक नगर पोलिसांनी सोमवारी (दि.७) गजाआड केले. विनोद ज्ञानेश्वर डोंगरदिवे (वय-२४ धंदा- ड्रायवर रा.संजयनगर ग.न ५ औरंगाबाद आणि प्रदीप आत्माराम जाधव (वय-२७ रा.क्रांतीनगर जिल्हा कोर्टाच्या पाठीमागे औरंगाबाद) अशी आरोपींची नावे असून गुन्ह्यात वापरलेली विनाक्रमांकाची रिक्षा हस्तगत करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.७) पुंडलिकनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अटल चोर खिसेकापु हा त्याचे साथीदाराचे मदतीने रिक्षातील सह प्रवाशांना लुटतो व सध्या रेल्वे स्टेशन परिसरातील विट्स हॉटेल जवळ बसलेला आहे. माहिती मिळताच डी.बी पथकाने धाव घेऊन अट्टल चोर (खिसेकापु) विनोद डोंगरदिवे आणि प्रदीप जाधव यांना ताब्यात घेऊन पो.स्टेला आणले त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली. त्यावेळी त्यांनी रविवारी (दि.६) १.३० ते २ वाजेच्या सुमारास गजानन भिकनराव देशमुख रा.लोणी लव्हाळा ता.मेहकर जि.बुलढाणा यांचे सोबत ऑटो रिक्षा मध्ये सहप्रवाशी म्हणुन बसुन त्याचे खिशातील ५० हजार रुपये हे रिक्षामध्ये गर्दी करुन हातचलाखीने चोरले होते अशी गुन्हयाची कबुली दिली आहे. त्याचा फरार साथीदाराचा शोध घेवुन त्याला अटक करुन गुन्ह्यातील गेलेला माल रोख रक्कम हस्तगत पोलीस करीत आहेत.

विशेष म्हणजे या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा विनाक्रमांकाची असल्याने सीसीटीव्ही कैद होऊनही अडचणी येत होत्या. मात्र, गुप्त बतमीदारामुळे गुन्हा उघडकीस आणण्यात मोठी मदत झाल्याचे पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उप-आयुक्त डॉ.राहुल खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पो.ठाणे पुंडलिकनगर घनश्याम सोनवणे, प्रो.पो.उपनि विकास खटके, पोह- रमेश, मच्छीद्र शेळके, रवि बि-हाडे, पोना/बाळाराम चौरे, जगदीश चव्हाण पोशि/जालिदर मांटे, यदमळ, प्रविण मुळे, शिवाजी गायकवाड, नितेश जाधव, दिपक जाधव, SPO गोर्डे , स्वप्नील विट्टेकर यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!