Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : ट्रु-कॉलर, ओएलक्स, कस्टमर केअर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार, सायबर क्राईम शाखेपुढे तपासाचे आव्हान

Spread the love

औरंंंगाबाद : ट्रू -कॉलर, ओएलएक्स, कस्टमर केअर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार दरदिवशी वाढत आहेत. विशेष म्हणजे फसवणा-यांकडून सैनिक, मोठ्या उद्योजकांचे नाव ट्रु कॉलर, ओएलएक्स वापरून फोन केले जात आहेत. औरंगाबादमध्ये अशा तक्रारी सायबर क्राईमसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये येत असल्यातरी त्याची नोंद मात्र त्वरीत घेतली जात नाही. बँकेकडूनही तक्रार अर्जच मागितला जात असल्याने फसवणूक झालेल्यांची मोठी कोंडी होत आहे.


दस-याच्या पाश्र्वभूमीवर ऑनलाईन खरेदीदारांची वेगवेगळ्या माध्यमावर झुंबड उडणार आहे. त्यामाध्यमातून अनेकांची फसवणूकही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोनच दिवसात अनेक प्रकार औरंगाबादेत घडले आहेत. विशालला जुन्यातली एक कार खरेदी करायची होती. ओएलएक्सवर पसंत केलेली कार एका सैनिकाची असल्याचे त्याला समजले. त्याने त्या सैनिकाशी संपर्क साधला. सैनिकाने त्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, कॅन्टीनमधील खरेदीसाठीचे कार्ड व कारची अधिकृत नोंद असलेली कागदपत्रे विशालला पाठवली. मात्र जेव्हा विशालने सायबर क्राईममध्ये काम केलेल्या एका पोलीस अधिका-याला सर्व माहिती दिली तेव्हा केलेल्या तपासणीत सारा प्रकारच बनावट असल्याचे समोर आले.

भारती या तरुणीला फसवण्यात आल्याचा प्रकार वेगळा आहे. तिने दस-यासाठी म्हणून साडी, मुलांचे कपडे आदी ऑनलाईन खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यात तिला ४० हजारांना फसवण्यात आले. कस्टमर केअरच्या प्रकारात प्रथमेश यांनी गॅसचे सिलिंडर नोंद केले. त्यांना सुरुवातील ४५ रुपये भरण्यास सांगितले. ते त्यांनी भरले. त्यातून त्यांची काही माहिती काढून १८ हजार ६५० रुपये बँक खात्यावरून काढून घेण्यात आले. गॅस सिलिंडर नोंदणीसह खासगी बस वाहतुकीचे तिकीट नावे करणे, गुगल पे, ई-वॉलेटच्या माध्यमातूनही फसवण्यात आल्याच्या घटना सायबर क्राईम शाखेकडे येत असल्याचे सायबर पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी सांगितले.


ऑनलाईन व्यवहार करतांना खबरदारी घ्या – कैलास  देशमाने

ऑन लाईन खरेदी करताना अनेक बनावट कंपन्या असून त्यांच्याशी व्यवहार करताना खरेदीदाराने पूर्ण सूचना, नियम पाळूनच पुढील पाऊल उचलावे. गुगल किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिनवरून कस्टमर केअर आदींचे नंबर घेऊ नये, असे सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने आणि सहायक पोलीस निरीक्षक राहुल खटावकर यांनी सांगितले.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!