नऊ महिन्यांपूर्वीच पोलीस दलात रुजू झालेल्या पोलीस उपनिरिक्षकाची आत्महत्या

Maharashtra: Police Sub Inspector Dhanaji Sakharam Raut, who was posted at Mumbai's Andheri Railway Police Station, allegedly committed suicide today morning by hanging himself.
— ANI (@ANI) September 30, 2019
नऊ महिन्यांपूर्वीच ठाणे पोलीस दलात रुजू झालेल्या एका पोलीस उपनिरिक्षकाने (पीएसआय) सोमवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यातील वर्तकनगरमधील आपल्या घराजवळ त्यांनी एका बागेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
धनाजी सखाराम राऊत (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या पीएसआयचे नाव आहे. नऊ महिन्यांपूर्वीच ते ठाणे पोलीस दलात रुजू झाले होते. नुकताच त्यांचा नोकरीतील प्रोबेशनचा काळ संपला होता. त्यामुळे त्यांना अंधेरी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीसांत नियुक्ती देण्यात आली होती. मुंबईतील वाडी बंदर येथील मुख्यालयात रुजू होण्याचे त्यांना आदेश मिळाले होते. ताणतणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पीएसआय राऊत हे ठाण्याच्या वर्तक नगर येथे राहवयास होते. आपल्या घराजवळच एका बागेत सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉक गेल्यानंतर बागेतच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रोबेशनमध्ये असताना राऊत यांच्यावर कुठल्याही प्रकारचा कामाचा ताण नव्हता. या काळात अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारे अधिकची जबाबदारी देण्यात येत नसल्याचे ही त्यांनी सांगितले.