Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत

Spread the love

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की ममता बॅनर्जी त्यांच्या घराच्या आवारात चालत असताना पडल्या, यादरम्यान त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी कालीघाट गृहसंकुलात फेरफटका मारत होत्या. यावेळी त्या पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना रक्तस्त्राव होऊ लागला. दरम्यान, त्यांना तातडीने कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. टीएमसीचे अखिल भारतीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी तेथे पोहोचले आहेत.

टीएमसीने आपल्या X हँडलवर ही माहिती दिली आहे. टीएमसीने लिहिले की, आमचे अध्यक्ष ममता बॅनर्जी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ममता यांचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांच्या कपाळातून रक्त येत आहे. त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या वर्षी जानेवारी महिन्यात देखील ममता यांचा अपघाताची झाला होता. त्यावेळी त्या वर्धमानहून कोलकात्याला परतत होत्या. पावसात धुक्यामुळे कारचे ब्रेक लावताना ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती. ममता यांच्या ताफ्यात दुसरी कार आल्याने चालकाला अचानक ब्रेक लावावा लागल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.

https://twitter.com/AITCofficial/status/1768286010264502610

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!