गोपीचंद पडळकर यांची पुन्हा घरवापसी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार असलेले गोपीचंद पडळकर यांनी भाजपात प्रवेश केला. पडळकर यांच्याबरोबरच काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा आणि शिरपूर काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण हे देखील भाजपात दाखल झाले आहेत.
मुंबईतील गरवारे क्लबमध्ये सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी वंचित आघाडीतून बाहेर पडलेले आणि पूर्वाश्रमीचे भाजपाचे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा भाजपात घरवापसी केली. तसेच काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा आणि शिरपूर काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपात प्रवेश केला. दरम्यान, काँग्रेसचे धुळ्याचे आमदार अमरिश पटेल हे काही दिवसांत भाजपा प्रवेश करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
भाजपा प्रवेशावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “भाजपात पहिल्यापासून कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. २०१४ पूर्वी या राज्याची परिस्थिती खुप वाईट होती. कोणी वाली भेटेल की नाही, असं वाटत होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या विकासाचं काम करत आहे. तर चंद्रकांत पाटील तळागाळात काम करतं आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काम केलं. महाड ते मुंबई रॅली काढली. आता सरकारने धनगर समाजाच्या पाठिशी उभं राहावं,” असं मत ही व्यक्त केलं.
https://www.youtube.com/watch?v=BG41ObUmT6U