चर्चेतली बातमी : भाजप – सेनेची “कागदी युती ” अखेर जाहीर !! चंद्रकांत पाटील आणि सुभाष देसाई यांचे संयुक्त पत्रक !!!

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांची महायुती कधी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना , प्रसार माध्यमांनी ‘ आज होणार , थोड्याच वेळात होणार , काही क्षणात होणार असे सांगितले जात असतानाच कोणाच्याही कल्पनेत नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात ” युती झाल्या” चे पत्रक अचानक पत्रकारांच्या हातात पडले आणि समजले कि एकदाची युती झाली, पण हि कागदावरची म्हणजे ” कागदी युती ” असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे युतीच्या विषयाला आता पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान असे भाजप सेनेने का केले ? याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही. भाजप- सेना महायुतीची घोषणा स्वतः पक्षाचे राष्ट्रे कार्याध्यक्ष जे. पी . नड्डा करतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे करतील असे समजून पत्रकार त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या निमंत्रणाचा वाट पाहत होते ते वाट पाहताच राहिले आणि अखेर संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली . मात्र ही घोषणा करताना जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या पत्रकावर केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याच सह्या आहेत. मित्रपक्षातील इतर नेत्यांच्या या पत्रकावर सह्या नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
या पतर्कात नमूद करण्यात आले आहे कि , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले, रासप नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महायुतीचा निर्णय घेण्यात आला असून तशी घोषणा करण्यात येत आहे. महायुतीतील कोणता पक्ष किती जागा व कोणत्या जागा लढवणार याचा तपशील लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे चार दिवस बाकी असतानाही महायुतीच्या जागांचा तपशील लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. यावरून युतीत जागा वाटपावरून वाद असल्याचं अधोरेखित होत आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवून मित्र पक्षांना झुलवण्याचा किंवा बंडखोरीला आळा घालण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला असेल असा कयास लावण्यात येत आहे. बाकी काहीही असो या विषयावर आता पडदा पडला आहे.
गेले अनेक दिवस अडलेलं महायुतीचं चर्चेचं गुऱ्हाळ अखेर औपचारिकपणे एक छोटं पत्रक काढून थांबलं. पण जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र अद्याप घोषित नाही. दरम्यान कालपासूनच भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला सुरुवातही केली होती, पण घोषणा व्हायची बाकी होती. ती सोमवारी संध्याकाळी निव्वळ पत्रक काढून करण्यात आली. संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचं मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी टाळलं. त्यामुळे कोणाला कुठली जागा मिळणार, जागावाटपाचा फॉर्म्युला काय हे स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदही घेतली पण जागावाटपाचा निर्णय मी जाहीर करणार नाही, असं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात होते. त्यांनी तिथे पत्रकार परिषद निश्चित असं सांगितलं. पण जागावाटपाविषयी कुणीच काही बोलायला तयार नाही.