मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचे चर्चेतले ट्विट : राष्ट्रपिता नरेंद्र मोदीजी ….

Wishing the Father of our Country @narendramodi ji a very Happy Birthday – who inspires us to work relentlessly towards the betterment of the society ! #HappyBDayPMModiJi #HappyBdayPMModi #HappyBirthdayPM #happybirthdaynarendramodi pic.twitter.com/Ji2OMDmRSm
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 17, 2019
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी केलेले ट्विट सध्या गाजत असून त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले आहे . ( father of Country ) या ट्विटची सर्वत्र चर्चा आहे. ‘फादर ऑफ नेशन म्हणजे राष्ट्रपिता ‘ हा शब्द प्रयोग महात्मा गांधी यांना उद्देशून करण्याची देशात प्रथा आहे . त्याच धर्तीवर मिसेस मुख्यमंत्र्यांनी मोदींना नवीन बिरुद लावल्यामुळे ट्विटरवर विविध प्रतिक्रिया उमटल्या. समाजाच्या कल्याणासाठी निरंतर सेवा करण्याची प्रेरणा देणाऱ्या देशाच्या पित्याला (राष्ट्रपिता) वाढदिवसाच्या शुभेच्छा , असे त्यांनी म्हटले आहे. सोबत अमृता फडणवीस यांनी स्वतः एका कार्यक्रमात गायलेल्या ‘मिट्टी के सितारे’ या शोच्या ‘ओ रे मनवा तू तो बावरा है तू ही जाने तू क्या सोचता है’ हे गाणं अमृता यांनी सादर केलं होतं. गाण्याच्या प्रोमोचाही ट्वीटमध्ये समावेश आहे.